माहिती तंत्रज्ञानलेख

सांगणिकीय वित्त व्यवहार (संविव्य)

सांगणिकीय वित्त व्यवहार (संविव्य)

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 29/6/2023 :
संगणकीय वित्त व्यवहार (संविव्य) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाची देवाणघेवाण इतकी सहजतेने होऊ शकते ही कल्पना सुद्धा दहा वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेली नव्हती. कोव्हीड रोग आला आणि त्याने भारतीयांची विचारसरणीच बदलून गेली. पैशाच्या देवाण घेवाणीतून रोग पसरतो, हे समजल्यावर पैशाला हात लावणे सुद्धा मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आणि संगणिकीय वित्त व्यवहार (संविव्य) हे माध्यम चितपरिचित झाले. भाजीविक्री, केसकर्तन पासून मोठे व्यवहार देखील संविव्यतून होऊ लागले.
वास्तविक अगदी 2017 पासून या व्यवहाराची सुरुवात पेटीएम Paytm नावाच्या कंपनीने केली होती, परंतू जनतेने त्यांच्या या व्यवहारात करोना येईपर्यंत फारसा उत्साह दाखवला नाही.
खरंतर या प्रकारचा रोग आला नसता तर आजही खरेदी, विक्री परंपरागत चलन देवाणघेवाण सुरु राहिली असती, यासाठी करोनाला एक प्रकारे धन्यवादच द्यावे लागतील.
आजपावेतो तीन वेळा नोटबंदी झाली होती! सर्वात प्रथम सन 1946 मध्ये इंग्रजांनी नोटबंदी आणून पाच हजार, दहा हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या. अगदी तसेच जनता पक्षाच्या राजवटीत मोरारजीभाई सरकारने 1975 साली पाच हजार, दहा हजार रुपयांच्या नोटा नाहीश्या केल्या. 2016 मध्ये मोदींनी एक हजार रुपयांच्या नोटेला हद्दपार करून काही काळापुरते, दोन हजार रुपयाची नोट बाजारात आणली आणि त्याच वेळेस या नोटेला भविष्यात रद्दबदल करण्याचे आराखडे मांडण्यात आले.
हळूहळू भारतातील मोठ्या रकमेच्या नोटांचे व्यवहार बंद झाल्यामुळे रुपये 2000 च्या नोटेला आम व्यवहारात फारसे महत्त्व राहिले नाही. काही दिवसापूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडियाने सर्व दोन हजार रुपयांच्या नोटा परत मागवल्या आणि मोठ्या संख्येच्या नोटेला पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहायची वेळ आली.
संविव्य भारत हे फार मोठे यश भारताला प्राप्त झालेले आहे. अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्राला अजून इतक्या सहजतेने संविव्य जमले नाही, ते भारताने सहज आत्मसात केले, यासाठी यूपीआय (Unified Payments Interface)या प्रणालीला शंभर पैकी शंभर मार्क द्यावे लागतील. नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी यूपीआय प्रणाली तयार केली आहे.
याच गतीने भारताने प्रगती केल्यास, तो दिवस फार लांब नाही, ज्या दिवशी पाचशे, दोनशे, व शंभर रुपयांच्या नोटा सुद्धा बंद होतील. तो देशासाठी क्रांतिकारक दिवस ठरेल, आणि ते लवकरच व्हावे ही सदिच्छा.
संविव्य शंभर टक्के यशस्वी झाल्यास काळा पैसा नाहीसा होईल, चोरी, पाकिटमारी थांबेल, सरकारचा नोटा छपाईवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाचेल ज्यामुळे उच्च दर्जाचा आयात केलेला कागद लागणारच नाही, त्यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचेल. काही प्रमाणात का होईना भ्रष्टाचाराला आळा बसेल, सर्व वित्तीय व्यवहारात पारदर्शकता येईल, कर वसुली सुलभ होईल, अनेक व्यापाऱ्यांच्या कर बुडवेगिरीवर आळा बसेल, सरकारी तिजोरीत जास्त कर जमा होईल.
एटीएम (ATM) यंत्रे कालबाह्य ठरतील. एटीएम यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्यांना ही धोक्याची घंटा आहे हे समजून घ्यावे, नाहीतर त्यांचा नोकिया होईल. सुजाण नागरिकांना मी काय म्हणतोय हे समजले असेल. बँकेत कॅशियर अर्थात रोखपाल पद निघून जाईल. अनेक बँका आपल्या शाखा कमी करतील, बँकेत कर्मचारी वर्ग सुद्धा कमी लागेल, थोडक्यात आज जितके कर्मचारी आहेत त्याच्या अर्ध्याहून कमी लागतील. कॅश घेऊन येणारे-जाणारे कर्मचारी तसेच त्यांना संरक्षण देत गाडीतून कॅश नेणाऱ्या अनेक एस्कॉर्ट कंपन्यांना दुसरे उद्योग शोधावे लागतील. थोडक्यात काय तर आजचे अनेक बँक व्यवहार कालबाह्य होणार, जसे पासबुक मिळणार नाहीत, फिक्स डिपॉसिटी सारखे व्यवहार संविव्यतून होतील, रोखपालाची जागा राहणार नाही. तसेही गेल्या काही वर्षांपासून चेकबुक कुरियर ने घरपोच पाठवतात, चेकबुकची गरज सुद्धा नाममात्र राहील, वगैरे.
सांगणिकीय वित्त व्यवहाराने अनेक रोजगार जातील, त्याच बरोबर इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजीमधील नोकऱ्या वाढतील. तरुणांनी या सर्व उलथा पालथीचा सखोल अभ्यास करावा आणि त्या नुसार आपला अभ्यासक्रम निवडावा.
कोणत्याही संकटाला संधीत रूपांतर करणारा श्रेष्ठ ठरतो. पाहूया येणाऱ्या संकटाला कोण कसे संधीत रूपांतर करतात.


विजय लिमये
9326040204

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.