ताज्या घडामोडी
मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/12/2025 :
जीवनात अनेकदा आपण न झेपणाऱ्या जबाबदारी घेत असतो. त्यामध्ये आपली परीक्षाच असते. कसेही करून ती जबाबदारी पूर्ण करायची असा आपला निश्चय असतो.
जेव्हा ती पूर्णत्वास जाते तेव्हा मनस्वी आनंद होतो. एक वेगळेच समाधान वाटते. आत्मविश्वास वाढतो. यापेक्षा मोठी जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता होते.
दुर्दैवाने आपण घेतलेली जबाबदारी आपण पूर्ण करू शकलो नाही तरी हताश न होता त्याचे विश्लेषण करावे. कुठे कमी पडलो, काय चुकले, अजून काय प्रयत्न करायला हवे होते? हे समजल्यानंतर आपला अनुभव वाढतो जो भविष्यात उपयोगी पडतो.
आजचा संकल्प
घेतलेली जबाबदारी पार पाडत असताना यशस्वी झालो तर समाधान मिळते. यश आले नाही तर अनुभव मिळतो हे लक्षात घेऊ व कार्य करत राहू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

