सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 26/01/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी दिली.
या प्रसंगी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर अकलूज चे व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र माने देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा थोडक्यात सांगितला व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वताचे, महाविद्यालयाचे आणि देशाचे नाव उंचवावे व देश प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यरत रहावे असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रविण ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यानी महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती थोडक्यात सांगितली.
या प्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य वसंत जाधव, मोहन लोंढे तसेच डॉ. भीमराव भांगे, प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, महाविद्यालय समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. भारती चंदनकर यांनी केले.
