ताज्या घडामोडी

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन संपन्न

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे येथे 77 वा प्रजासत्ताक दिन संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/01/2026 :
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे.
आज संस्थेमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी चेतन शहा व सारिका शहा (प्रसिद्ध उद्योजक बारामती) यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. तसेच संस्थेमध्ये आरओ फिल्टर चे उद्घाटन श्रीमती शुक्ला संतोष दोशी व डॉक्टर बाहुबली संतोष दोशी ( एमडी पॅथॉलॉजिस्ट व गोल्ड मेडलिस्ट अकलूज ) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवायत, राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सादर केले. तसेच राष्ट्रभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली तसेच स्पोर्ट मध्ये जिल्हास्तरावर जिंकलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चेतन शहा यांनी रत्नत्रय संस्थेतील विविध उपक्रमांचे कौतुक केले व त्यांनी विद्यार्थ्यांचे उपक्रम पाहून मी भारावून गेलो तसेच अनंतलाल दादांचे कार्य हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यासारखे महान आहे. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना अल्प फी मध्ये ते शिक्षण उपलब्ध करून देतात ही गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंतलाल दादा यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिन संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतामध्ये सांगितली. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे अनुकरण करावे असे मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव प्रमोद दोशी यांनी विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता अष्टपैलू व्यक्तिमत्व असले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे प्रतिपादन केले याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक विरकुमार दोशी तसेच मृणालिनी दोशी संस्थेचे संचालक अभिजीत दोशी, बबन गोपने, अजय गांधी,वसंत ढगे, सुरेश धाईन्जे, जाधव मॅडम, रामभाऊ गोपने, दत्ता भोसले, दिपक राऊत, सोमनाथ राऊत, मुख्याध्यापिका, उप मुख्याध्यापक, सुपरवायझर, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button