ताज्या घडामोडी

मनाची शुद्धता

मनाची शुद्धता

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 27/01/2026 : भरवसा हा शब्द आपण बोलताना अनेकदा वापरतो, अनुभवतो. कधी ज्याच्यावर भरवसा ठेवला तो विश्वसनीय ठरतो तर कधी आपण भरवसा ठेवतो अन् फसवले जातो.
जे लोक खरेच प्रामाणिक असतात ते स्वतःशी जसे प्रामाणिक असतात तसे इतरांशी पण प्रामाणिकपणे वागतात. त्यांच्यावर विसंबून राहता येते.
मात्र भरवसा ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीची पारख करता आली पाहिजे. त्या व्यक्तीला पण आपल्याबद्दल खात्री हवी. एकमेकांना पूर्णपणे ओळखणारी माणसे भरवसा ठेवायचा का नाही ते ठरवू शकतात.
आजचा संकल्प
इतरांवर भरवसा ठेवून त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या कार्यक्षमतेवर भरवसा ठेवू व आत्मविश्वासाने कार्यपूर्ती करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button