मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/12/2025 :
आपण प्रत्येकजण कागदोपत्री आपले हक्क व कर्तव्ये काय आहेत ते पाहतो. त्याप्रमाणे हक्कासाठी जागरूक असतो व जमतील तितकी कर्तव्ये पण करतो.
मात्र काही अलिखित गोष्टी असतात पण त्या पाळल्या तर आपल्याला समाधान वाटते. जसे की नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, आरोग्य जपणे. याच्या जोडीला आनंदी राहणे हे सुद्धा महत्वाचे आहे.
स्वतःला कमी न समजता व इतरांशी स्वतःची तुलना न करता स्वतःला घडवत राहणे महत्वाचे. कालच्या पेक्षा आज सुधारणा करायची. चूक झाली असली तर सुधारायची व आपला आत्मविश्वास कायम ठेवायचा.
आजचा संकल्प
स्वतःला माफ करणे, इतरांशी कोणत्याच पद्धतीची तुलना न करणे व कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास कमी होऊ न देणे या गोष्टी लक्षात ठेवू व आनंदाने जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

