ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/12/2025 :
शालेय जीवनात आपल्या यशात सर्वात महत्वाची अडचण म्हणजे “आळस”. कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ती वेळेत सुरू करून वेळेत संपवली पाहिजे. पण नेमका आळस आडवा येतो.
पहाटे उठून व्यायाम करणे किंवा अभ्यास करणे या दोनही गोष्टी आपली शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढवणाऱ्या आहेत. पण नेमका आळस आडवा येतो व केलेले संकल्प तसेच राहतात.
मुलांनो, मोठे ध्येय ठेवा पण गोष्टी टप्प्या टप्प्याने करा. हळू हळू करा अन् पूर्णत्वास न्या. एकदम मोठे ध्येय डोळ्यापुढे आले की अगोदरच जीव दडपतो. एक मन म्हणते, ‘करू नंतर!’ अन् इथेच आपण मागे राहतो.
आळस झटका, कामाला लागा. यश तुमचेच आहे.
सौ. स्नेहलता स. जगताप.

