ऐतहासिकप्रेरकमहाराष्ट्रलेख

देवभूमी कान्हदेश! रामायणातील खान्देशी स्थळ व व्यक्ती!

देवभूमी कान्हदेश!
रामायणातील खान्देशी
स्थळ व व्यक्ती!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

भाग पहिला

अकलूज दिनांक 26/8/2023 :
खान्देश हां कान्हदेश आहे. ती राम कृष्णाची पवित्र भूमी आहे. या भागात रामकृष्णाचे वास्तव्य होते. आधी राम कथा सांगतो मग कृष्ण कथा सांगेन.
प्रभुरामचंद्र त्रेता युगात होऊन गेले. त्या काळात खान्देशला दंडकारण्य, तपोवन किंवा जनस्थान म्हणत असत. इथे तापीच्या खोऱ्यात प्रचंड दाट झाडी होती, आरण्य होत म्हणून त्या भूमिला दंडकारण्य म्हणत असत. इथे तापी तें तपोवन ही तपस्वीची तप करण्याची भूमी होती म्हणून तीला तपोवन म्हणत. या भूमीत माणसांने केलेल्या पुण्यकर्माचे 100 पटीत पुण्य प्राप्त होत असे अशी मान्यता होती म्हणून हे जंगल तपोवन या नावाने ओळखले जायचे. या तपोवनात पुण्यप्राप्त व्हावे म्हणून गोदावरीच्या काठावर, नेपाळचे महाराज जनक जे सीता मातेचे पिता, त्यांनी इथे यज्ञ केला, म्हणून या दंडकारण्याला जनस्थान असेही नावं मिळाले. याच यज्ञ सोहळ्यात सितेचे स्वयंमवर झाले आणि नंतर विवाह जनकपुरीत झाला. द्वापार युगातील नावा बद्दल आपण पुढे चर्चा करू. याच कारणामुळे तात्यासाहेब शिरवाडकर यांचे नावे दिला जाणारा साहित्य पुरस्कार हां जनस्थान पुरस्कार या नावे दिलां जातो.
तर रामायण महाभारत हे भारतीय संस्कृतेचे प्राण आहेत. आता इथे फक्त रामायण बघू. रामायणातील 70% भाग खान्देश म्हणजे दंडकारण्यात घडला आहे. बाकी 30% रामायण अयोध्या, जनकपूर आणि लंकेत घडलं. रामायणाची सुरवातच खांदेशातून झाली.
चाळीसगाव तालुक्यात वालझरी नावाच गाव आहे. इथे वाल्या कोळ्यांचा जन्म झाला. पुढे तरुण झाल्यावर विवाह झाला आणि चारितार्थ चालविण्यासाठी त्याने वालझरी येथे वाटमारीचा व्यवसाय सुरु केला. तो वाटमारी करतानां लोकांना तर लुटायचाच पण त्यांची हत्याही तो करत असे. एक माणूस मारला कीं एक खडा रांजनात टाकत असे. असे सात रांजण त्याने भरले. इथून जवळच रांजनगाव आहे. तिथे अजूनही हे सात रांजण उपलब्ध आहेत.
वाल्याकोळी हां खांदेशात आढळणाऱ्या टोकरे कोळी या जमातीतील होता. टोकर हां अहिराणी शब्द आहे. टोकर म्हणजे बांबू वेळू. वेळूचा वेलू, वेलूचा वाल्या आणि वाल्याचा वाल्मिक असं तें नावं आहे. वाल्या कोळ्याची पूर्ण कथा तुम्हाला माहीत आहे. ती आता इथे सांगत नाही. तर या वाल्याला नारदाने दिक्षा देऊन राम नामाचा जप करायला सांगितला. त्यातून वाल्याचा वाल्मिक झाला. त्याचा वालझरी इथे आश्रम होता. तिथं तो आपलं तपस्वी जीवन व्यतीत करत असे. रोज सकाळी उठून भल्या पहाटे गिरणा नदीवर आंघोळीला जात असे. असेच एके दिवशी गिरणा नदीवर जात असताना एक घटना घडली. आकाशातून क्रउंच पक्षाचा जोडा उडत जात होता. त्या क्षणी एका व्याधने त्यांना बाण मारला. तो मादी पक्षाला लागला. ती जमिनीवर कोसळली. तिच्या जवळ येऊन नर पक्षी आक्रोश करू लागला. आणि नंतर तोही त्याचं जागी गतप्राण झाला. हे संपूर्ण करुण दृश्य वाल्मिक ऋषीं जवळून पहात होते. तें पाहून त्यांच्या तोंडातून जगातील पहिले महाकाव्य बाहेर पडले तें रामायण. या प्रसंगातील मादी पक्ष ती सीता, नर पक्षी तो राम आणि व्याध तो रावण. अशी पात्र संहिता तयार करून वाल्मिकी यानी रामायाण लिहिले. या बाबत अशी आख्यायिका आहे कीं, वाल्मिक ऋषीने आधी रामायण लिहिले आणि नंतर त्या कथे बरंहुकूम रामायण घडले. अशी मान्यता आहे. ही आहे रामायणाची सुरवात आणि ती चाळीसगाव तालुक्यातील वालझरी इथे झाली आहे. आपण कधी वालझरी इथे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला वाल्मिक ऋषींची समाधी मंदिर, गोमूख दिसेल. तिथेच त्यांचा आश्रमही होता. बाजूला रांजणगाव आहे. या सर्वं स्थळानां तुम्ही भेट देऊ शकता.

बापू हटकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.