श्री संत नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी : डॉ. नारायण पाथरकर
श्री संत नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी : डॉ. नारायण पाथरकर
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 7/9/2023 :
श्री संत नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी असे मत अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायण पाथरकर यांनी पंढरपूर येथे व्यक्त केले. अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांची पहिली सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत योगा भवन पंढरपुर येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज हभप मुकुंद महाराज नामदास व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे हे उपस्थित होते.
यावेळी एस एस टोनी, रेखा वर्मा, बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी, मनोज भांडारकर, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार, दिनकर पतंगे, कैलास धोकटे संतोष मुळे, राजेंद्र धोकटे, गणेश उंडाळे, आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना, राज्य सरकारने येत्या कार्तिक एकादशीला संत नामदेव महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्यात यावी असा ठराव मंजूर केला. संपूर्ण देशात शिंपी समाज विविध पोट जातीत रोटी बेटी व्यवहार करणे व विखुरलेला समाज संघटन करून एकाच छताखाली काम करण्याचा ही निर्णय घेतला पंढरपुर येथे संत नामदेव महाराज यांचे स्मारक तात्काळ करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. पंढरपूर ते घुमान (पंजाब) वारकरी सदभावना रेल्वे गाडी सुरू केली जावी.नाशिक येथे आगामी कुंभमेळाच्या ठिकाणी संत नामदेव आखाडा साठी जागा उपलब्ध करून द्यावी, समाजातील युवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी बँक स्थापन करण्याचेही ठरले. अश्या मागण्यांचा ठराव मंजूर केल्याचे डॉ.पाथरकर यांनी सांगितले.
यावेळी मुकुंद महाराज म्हणाले की सर्व शिंपी समाजातील बांधवांनी एकत्र आले पाहिजे. समाज कार्य करण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाचे आशिर्वाद आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. महासंघाच्या कार्यास आमच्या परिवाराकडून शुभेच्छा आहेत.
यावेळी प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे म्हणाले की सर्व शिंपी समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजात एकोपा निर्माण केला पाहिजे. तसेच सर्व शिंपी सह पोट जातीची जनगणना करून प्रदेश स्तरावर कोअर कमिटी करण्यात यावी. संत नामदेव महाराज यांची २०२५ ला संजीवन समाधी सोहळ्यास ६७५ वर्ष पूर्ण होत असून यासाठी केंद्र शासनाचे चलनी नाणे व टपाल तिकीट काढावे व मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे पंढरपूर, नरसी, घुमान येथे यात्री निवास बांधले गेले पाहिजे. पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांच्या पायरीचे दर्शन हे आषाढी व कार्तिकी ला वारकरी,भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिर समितीने लक्ष दिले पाहिजे.असे ढवळे म्हणाले.
या बैठकीला भारतातील १५ राज्यांतून प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. महेंद्र दर्जी ओरीसा (बंगाल),राकेश आर्य (उत्तराखंड),मुकेशजी नामदेव (हरिद्वार) (हरियाणा),अरुण नामदेव(मध्य प्रदेश)महेंद्र तांडी (चेन्नई)रमेश परमार (गुजरात),रमेश भीमे (गोवा) आदि राज्यातील पदाधिकारी,महिला उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दिलीप बंगाळे, दत्ता चांडोले, प्रसाद निकते, शैलेश धट, महेश गाणमोटे, ज्ञानेश्वर वडे, बाबासाहेब मईंदरकर, प्रथमेश परंडकर, दत्तप्रसाद निपाणकार, अक्षय चांडोले,अमर जंवजाळ, निलेश घोकटे, शिवकुमार भावलेकर, प्रशांत माळवदे, अनिल जवंजाळ आदींनी परिश्रम घेतले.