⭕ “आश्रम शाळा झाली मृत्यू शाळा”…!
⭕ “आश्रम शाळा झाली मृत्यू शाळा”…!
🟣आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू , विषबाधा, घातपातामुळे मृत्यू , विद्यार्थिनीवर अत्याचार असे प्रकरण सतत होत आहेत. सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू संदर्भात आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर अनेकदा ताशेरे ओढले. तरी पण आपला आदिवासी विकास विभाग झोपेचं सोंग घेतलेल्या अवस्थेमध्ये आहे.
आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नाशिक,
अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय अमरावती, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ
व शिक्षण विस्तार अधिकारी हे अधिकारी फक्त कमिशन खाण्याच्या कामाचे आहे.या अधिकारी वर्गांना व आदिवासी विकास मंत्री गावीत यांना सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू संदर्भात काहीच दुःख नाही : संजय वामनराव बडवाईक यांचा जाहीर आरोप.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 8/9/2023 : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत आदिवासी विकास मंत्री गावीत , आदिवासी आयुक्त नाशिक,अप्पर आयुक्त अमरावती नागपूर व प्रकल्प अधिकारी यांना दुःख नाही. यवतमाळ जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा लोहारा (तालुका जिल्हा यवतमाळ) दिनांक 2 सप्टेंबर 2023 ला सदर आश्रम शाळेतील इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी कुमारी तनिष्का विजय जगदळ या विद्यार्थिनीचा सदर आश्रम शाळेमध्ये मृत्यू झाला.सदर विद्यार्थ्यांनी ही आदिवासी समाजाची आहे. सदर आश्रम शाळांना अद्यापही प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ व अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय अमरावती यांनी अद्यापही भेट दिली नाही किंवा या प्रकरणाची चौकशी सुद्धा केलेली नाही. याबाबत मी प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी फोन उचलला नाही.व या प्रकरणाबाबत अप्पर आयुक्त अमरावती श्री वानखडे यांना सदर विद्यार्थिनीच्या मृत्यू बाबत चौकशी केली असता त्यांनी हे प्रकरण मला अद्यापही माहिती नाही असे उत्तर दिले. असे कटूसत्य प्रस्तुत लेखांमध्ये आदिवासी जनतेचा प्रतिनिधी संजय वामनराव बडवाईक यांनी दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी प्रसार माध्यमांसमोर उघड केले आहे.
शैक्षणिक सत्र २०२३…२४ या शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मध्ये धुळे नंदुरबार येथील आश्रम शाळेमध्ये एका आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू माहे ऑगस्ट महिन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील महागुळी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू , माहे ऑगस्ट महिन्यातील दिनांक 30 ऑगस्ट 2023 ला वर्धा जिल्हा कारंजा तालुका नारा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू ,व दिनांक 2 सप्टेंबर 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा आश्रम शाळेतील इयत्ता नववी मधील विद्यार्थिनीचा मृत्यू , तसेच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामधील आश्रम शाळेमध्ये शिळे अन्न दिल्यामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये सुद्धा शिळे अन्न दिल्यामुळे शंभर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये सुद्धा पोहे खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
भारत सरकारच्या केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कल्याण समितीने महाराष्ट्रातील आश्रम शाळेमध्ये भौतिक सुख सुविधा व शैक्षणिक दर्जा नाही. विद्यार्थ्यांना झोपायला पलंगगादी नाही. विद्यार्थ्यांना गरम पाण्याची व्यवस्था नाही. शाळेला सुरक्षण भिंत नाही. कॉम्प्युटर रूम नाही. विद्यार्थ्यांना स्वतंत्र वस्तीगृह ची व्यवस्था नाही.
महाराष्ट्र मध्ये जवळपास अकराशे आश्रम शाळा आहेत. एका आश्रम शाळेवर शिक्षण व भोजन व इतर खर्च यावर सरासरी महाराष्ट्र शासन तीन ते चार करोड रुपये वर्षाला खर्च करते.
एका विद्यार्थ्यामागे महाराष्ट्र शासन वर्षाला जवळपास 75 हजार ते एक लाख रुपये पर्यंत खर्च करते.करोडो रुपयाचे अनुदान संस्थाचालक यांना देऊन सुद्धा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दोन वेळचं व्यवस्थित जेवण सुद्धा मिळत नाही. त्यांना शिळे अन्न दिल्या जाते.
यामधूनच विद्यार्थ्यांना आरोग्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामधूनच विद्यार्थ्यांना विषबाधा सारखे प्रकार आश्रम शाळेमध्ये घडत आहेत. विद्यार्थ्याचे मृत्यू होत आहेत. शिक्षक अप डाऊन करतात. संस्थाचालक लक्ष देत नाही. मुख्याध्यापक लक्ष देत नाही. अधीक्षक लक्ष देत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थी आपापसात भांडण करतात व त्या भांडणांमधूनच वर्धा जिल्ह्यातील नारा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा घातपत्रामुळे मृत्यू झालेला आहे.
सर्व माझ्या मीडिया मित्रमंडळींना व आदिवासी जनतेला नम्र विनंती आहे की आश्रम शाळेतील जो काही गैर कारभार सुरू आहे त्याबाबत आवाज उठवणे आवश्यक आहे. असे आवाहन प्रसार माध्यमांना त्यांनी केले आहे .
सन 2022 …23 या शैक्षणिक सत्रामध्ये आश्रम शाळेतील भौतिक सुख सुविधा व शैक्षणिक दर्जा यासंदर्भात चौकशी करण्यात आली होती .
यवतमाळ जिल्ह्यातील 29 आश्रम शाळांना याबाबत प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांनी कारणे दाखवा नोटीस सुद्धा दिलेली आहेत परंतु अद्यापही कार्यवाही शून्य आहे.अमरावती एटीसी हे कोटी रुपये देऊन अमरावती येथे आलेले आहेत. त्यामुळे ते कोटी रुपये वसूल करण्याच्या कामात व्यस्त आहेत. प्रकल्प अधिकारी पांढरकवडा हे नवीन असल्यामुळे त्यांना आश्रम शाळेतील या गैर कारभारा संदर्भात काहीच कळत नाही व तेथील जे दहा पंधरा वर्षापासून त्याच ठिकाणी ठाण मारून आहे ते बाबू वर्ग कमिशन खाण्यामध्ये व्यस्त आहे. यवतमाळ जिल्ह्यातील चांदापूर आश्रम शाळेतील प्रकरणांमध्ये त्यांचे कमिशन खाणे उघडकीस सुद्धा आले होते. तेच प्रकल्प कार्यालयाचा कारभार पाहतात. यवतमाळ जिल्ह्यातील आश्रम शाळा या वाऱ्यावर आहेत.आश्रम शाळा आज मृत्यू शाळा झालेली आहे.मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपूर इत्यादी जिल्ह्यामध्ये आश्रम शाळांमध्ये संस्था चालक आदिवासी पालकांना भुलथाप्या घालून आणतात.
परंतु
या विद्यार्थ्यांची काळजी न घेतल्यामुळे मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहे. उदाहरण वर्धा जिल्हा कारंजा तालुका नारा आश्रम शाळा. आश्रम शाळा आचारसंहितेनुसार ज्या गावात आश्रम शाळा आहे त्या गावातील दहा किलोमीटर परिसरातीलच आदिवासी विद्यार्थी त्या वस्तीगृहामध्ये, आश्रम शाळेमध्ये निवासी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊ शकतो.
परंतु…
यवतमाळ, नागपूर, वर्धा, अकोला, नांदेड, वाशिम इत्यादी जिल्ह्यामध्ये मेळघाट मधील विद्यार्थ्यांना नियमबाह्यपणे प्रवेश दिल्या जातो. बोगस आश्रम शाळांची कायमस्वरूपी मान्यता रद्द करा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू बाबत संस्थाचालक यांच्यावर भारतीय दंड संहिता अधिनियम 302 अंतर्गत सदोष मनुष्यवघाचा गुन्हा दाखल करावा. आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान हडप केल्याप्रकरणी संस्थाचालक यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अशी मागणी ही प्रस्तुत लेखाद्वारे आदिवासी जनतेचा प्रतिनिधी संजय बडवाईक (95 45 96 62 49)
यांनी करीत “प्रशासन व्यवस्थाच जर चोर असेल तर दाद कोणाला मागायची” ?असा प्रश्न शेवटी उपस्थित केला आहे.