ताज्या घडामोडी

वाटमारे अर्थात अकारण व छुपे शत्रू

वाटमारे अर्थात अकारण व छुपे शत्रू

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/9/ 2024 : सुमारे वीस वर्षांपूर्वी आमच्या शहरात मा. बी डी पवार नावाचे न्याय दंडाधिकारी होते त्यांच्याकडे सिव्हिल व क्रिमिनल कामाचा चार्ज होता व्यवस्थित राहणे, व्यवस्थित बोलणे, कामाचा उरक व कायद्याची उमज हे त्यांच्याकडे उल्लेखण्यासारखे होते. इचलकरंजीहून ते कुठे बदलून गेले? आता कोठे आहेत त्याची माहिती माझ्याकडे नाही.
पण त्यांच्या तीन वर्षाच्या कालावधीत त्यांच्यापुढे काम करणे यामध्ये वकील वर्गाला आपला सन्मान वाटत असे व आनंद वाटत असे.
एकदा काय झाले,
माझी एक चेकची फौजदारी चा पक्षकार यांनी मला फोन करून कळवले. आज जे काम आहे त्यातील माझे पैसे आलेले आहेत. आपण ते काम काढून घेतल्यास माझी अडचण नाही. त्या पक्षकारायची अनेक कामे माझ्याकडे होती व आमचा परस्परांवर विश्वास होता
त्यामुळे मी माझ्या मदतनीसास काम काढून घेण्याची पुरसीस तयार करा म्हणून सांगितले.
सहीतील फरक
माझे इचलकरंजी कोर्टातील कामाकरून मी परगाव च्या कोर्टात चाललो होतो. त्यावेळी व्हरांड्यात माझा मदतनीस पुरसीस तयार करून घेऊन आला व त्यावर त्यांनी माझी सही मागीतली त्या कागदाला आधार म्हणून एका भिंतीचा घेतला व माझी सही केली.
तेवढ्यात मला अन्य कोर्टात पुकारले म्हणून मी तिथे गेलो अन्य कोर्टातील माझे काम दहा-पंधरा मिनिटांनंतर संपले.
चौकसबुथ्दीचे पवारसाहेब
मी पुन्हा कोर्टातून बाहेर पडायच्या तयारीत होतो त्यावेळी माझा मदतनीस माझ्याकडे आला व पवार साहेबांनी तुम्हाला बोलविले आहे म्हणून सांगितलं.
मी त्वरित पवार साहेबांच्या पोटात गेलो जे काम काढून घ्यायचे होते ते काम व त्यात आज दिलेली पुरसीस मा कोर्टाने आपल्यासमोर ठेवली होती
मा पवार साहेबांनी मला रुईकर साहेब कोणीतरी
या पुरसीस वर तुमची डुप्लिकेट सही केली आहे असे माझे मत झाले आहे म्हणून मी खात्री करण्यासाठी आपणास बोलावून घेतले आहे.
मी त्यांना सांगितले नाही की माझी सही आहे आणि मीच केली आहे.
तेव्हा पवार साहेब मला म्हणाले वकील पत्रावरील सही, कामावरील सही व काढून घेण्याची पुरसीस वरील सही यामध्ये फरक आहे वकील पत्रावरील सही ही फी मिळाली त्यावेळी होती आता काम निम्म्यातून संपल्यावर फी बुडाली आहे त्यामुळे सही अशी आली आहे असे मी विनोदाने म्हणालो त्यावर पवार साहेबनी स्मित हास्य केले व माझ्या कामात पुढील हुकूम केला
कथा लहान आशय महान
वाचताना ही गोष्ट अतिशय साधी व विशेष महत्त्वाचे नाही असे वाटण्याची शक्यता आहे पण या पवार साहेबांच्या कृतीत फार मोठा अर्थ भरलेला आहे
निकाल होणे महत्वाचे ?
आमच्या व्यवसायात अनेक वेळा पक्षकारांचे कोर्टाबाहेर आपसात झालेले असते त्यावेळी ते काम काढून घेताना आपल्या वकिलांच्या कडे गेलो तर त्यांची उर्वरित फी द्यायला लागेल म्हणून पक्षकार हे एखाद्या वकिलाला पाच पन्नास रुपये देतात व त्याच्याकडून अर्ज लिहून घेऊन आपली ओळख घालून काम काढून घेतात
त्यामुळे या वकिलाने काम करताना दाखल करताना जे कष्ट घेतलेले असतात ते तर वाया जातातच पण त्याची ठरलेली फी पण मिळालेली नसते.
फी बुडव्याची चलाखी
आज आपल्या खिशात पाच पन्नास रुपये पडले याचा आनंद व
मूळ वकीलास डावलून अर्ज दिलेला त्याचा आनंद मिळतो पण मूळ वकिलाचे नुकसान झालेले असते.
पिठासन अधिकारी हे पण ज्या वकिलाचे वकील पत्र आहे त्याला बोलावून घ्या त्याची सही मला या कामावर हवी आहे अगर पूर्वीच्या वकिलांचे नो ऑबजेक्शन पत्र द्या असा आग्रह धरत नाहीत.
डिस्पोजल????
काम संपते ना चला हुश्शs असे काही न्यायाधीशांना वाटत असते.
या न्यायाधीशांच्या काम संपवायच्या झपाट्याने वकिलांचे नुकसान होते पक्षकार व हे वाटमारे करणारी वकील हे मूळ वकिलाला फसवत असतात.
अशावेळी कदाचित दुसरा माणूस उभा करून पण काम संपवले जाऊ शकते यास डिस्पोजल झाले असे म्हणता येईल पण मूळ वकिलावर अन्याय झाला हे कोणाच्या लक्षात येत नाही.
पुढील लेखात या विषयातील दोन अनुभव मी कथन करणार आहे अशा वकिलांची नावे लेखात लिहिणे मला शक्य आहे पण त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे त्यांची बदनामी व्हावी असे माझे मत नाही.
वकिली कथा व व्यथा
या आगामी पुस्तकातील
वकिलांचे अकारण व छुपे शत्रू या प्रकरणातील संक्षिप्त भाग
पुढील भागात “वाटमारे” या विषयावर लेखन.

ॲड अनिल रुईकर
98232 55 049
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.