ताज्या घडामोडी

रानभाजी – गोखरू

रानभाजी – गोखरू

शास्त्रीय : ट्रायब्युलस टेरिस्ट्रिस
कुळ : झायगोफायलेसी
स्थानिक : सराटा, गोक्षुर
इंग्रजी : स्मॉल कॅलट्रोप्स

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/9/ 2024 : उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती आहे. शेतात, ओसाड, पडीक जमिनीवर ही तण म्हणून सर्वत्र आढळते. गोखरू हे तण असले तरी, ती महत्त्वाची औषधी वनस्पती असून तिला वर्षभर फुले व फळे येतात.
औषधी गुणधर्म
गोखरुची फळे मूत्राच्या विकारांवर, लैंगिक आजारपणात अत्यंत उपयोगी आहेत. फळांचा काढा संधिवातावर आणि मूत्राशयाच्या विकारावर उपयोगी आहे. मूत्रपिंडाच्या दुबळेपणात पाण्यात धने, जिरे, गोखरू समप्रमाणात घेऊन कुटून, उकळवून गार करून घेतल्यास मूत्रप्रवृत्ती सुधारते. गोखरूची पाने व कोवळी खोडे भाजीसाठी वापरतात. यामुळे मूतखडा होण्याची प्रवृत्ती थांबते. कारण एकदा मूतखडा झाला की वारंवार होत राहतो. हे होऊ नये म्हणून गोखरूची भाजी उपयोगी पडते. प्रमेहासारख्या व्याधीतही गोखरूची भाजी उपयुक्त ठरते. हृदयरोगांना मज्जाव करते. छाती भरली असल्यास ती कमी करण्यासाठी गोखरूची कोरडी भाजी देतात. कंबरदुखी, अंगदुखी यासाठी सुद्धा गोखरूची भाजी उपयोगी आहे.
पाककृती
# साहित्य – कोवळी भाजी, भिजवलेली मूगडाळ किंवा तूरडाळ, बारीक चिरलेला कांदा, जिरे, मोहरी, हिंग, तिखट, मीठ इ.
# कृती – भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्यावी. कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग यांची फोडणी करून त्यात डाळ व कांदा परतून घ्यावा. नंतर चिरलेली भाजी घालावी. चांगले परतून घ्यावे. तिखट, मीठ घालावे. नंतर थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी.

संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.