ताज्या घडामोडी
पोलीस दादा तुला मी पाहिला
पोलीस दादा तुला मी पाहिला
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/12/2025 :
पोलीस दादा तुला मी पाहिला
घेऊन हातात काठी,पिस्तुल कंबरेला
कडक उन्हात घामाने लथपतलेला
थंडीत कुडकुडत,पावसात भिजलेला
पोलीस दादा मी तुला पाहिला
तू संरक्षणाची ढाल सज्जनासाठी
तूच धारदार तलवार दुर्जनांसाठी
सदैव जीवावर उदार असलेला
पोलीस मामा तुला मी पाहिला
दंगलीत काचा- दगडधोंडे खाणारा
छातीवर घावावर घाव झेलणारा
खिंड लढवीत रक्तबंबाळ झालेला
पोलीस भावा तुला मी पाहिला
एके 47 ला लाठीने भिडणारा
अतिरेक्यांच्या मुसक्या अवळणारा
२६/११ला देशासाठी वेडात दौडलेला
शहिद होताना शुरा तुला मी वंदीला
दांडक्याचा धाक, तुझ्या डोळयात अंगार
परी निष्पाप-निराधारांचा तू आधार
तू थंडगार,कधी रागाने लालेलाल
विविध रुपात देवा तुला मी पाहिला
🚩जय शिवराय
विलास शिंदे

