ओंकार साखर कारखाना ऊसास रुपये 3150/- दर देणार ; पहिला हप्ता रु.3050/- तर दिपालीसाठी 100 रूपये : बाबुरावजी बोञे पाटील

ओंकार साखर कारखाना ऊसास रुपये 3150/- दर देणार ; पहिला हप्ता रु.3050/- तर दिपालीसाठी 100 रूपये : बाबुरावजी बोञे पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/12/2025 :
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी 2025 – 2026 या गळीत हंगामाच्या शुभारंभाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास जिल्ह्य़ात उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवणार असा शब्द शेतकऱ्यांना दिला होता, तो शब्द खरा केला. ऊसाची पहिली उच्चल प्रति मे. टनास 3050/- तर दिवाळी सणासाठी 100/- रूपये देण्यात येणार आहेत. असे ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी सांगितले.
ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी
सोलापूर जिल्ह्य़ातील बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने अङचणीवर मात करून चालु केले. शेतकरी, कर्मचारीवर्ग यांना विश्वास दिला की तुमच्या श्रमाला योग्य तो दाम दिला जाईल त्या प्रमाणे गत वर्षीच्या ऊसास जिल्ह्य़ात उच्चांकी दर दिला.
2025 – 2026 या सिझनाचा ऊसाचा दर 3150 /- जाहीर केला. या वेळी जनरल मॅनेजर, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते उच्चांकी दर जाहीर केल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठानच्या वतीने बोञे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.

