आपला जिल्हाप्रेरक

शिक्षक एक ज्ञान योगी असतो : अनंतलाल दोशी

शिक्षक एक ज्ञान योगी असतो : अनंतलाल दोशी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 6/9/2023 :
“चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामधला विद्यार्थी सदैव जिवंत असतो, आणि खरा तोच ज्ञान योगी असतो” असे मत रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांनी व्यक्त केले. मंगळवार दिनांक 5 सप्टेबर 2023 रोजी माळशिरस तालुक्यातील रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील 40 शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते घेण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकं पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो असेही त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस चेअरमन प्रमोद अनंतलाल दोशी यांनी, शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.असे विचार व्यक्त केले.


प्रशालेतील इयत्ता बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे शिक्षक म्हणून शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
एक दिवसाचे समन्वयक म्हणून पुष्कर दोशी व मुख्याध्यापक म्हणून समर्थ सूळ यांनी जबाबदारी सांभाळली.
आयुष्यातले पहिले शिक्षक म्हणजे आपले आई वडील आणि त्यांच्यानंतर आपल्याला घडवतात ते आपले शाळेतले शिक्षक. अगदी बालवर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत आयुष्यात अनेक शिक्षक येतात आणि वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वाट दाखवत असतात. या प्रवासात काही शिक्षक आपल्या पालकांइतकेच जवळचे होतात. अशा शिक्षकांचा गौरव करण्याचा, त्यांच्याप्रती प्रेम, आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय.
सदर कार्यक्रमास अनंतलाल दोशी, विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, वैभव शहा, बबन गोफणे, रामदास गोपणे, दत्ता भोसले, ज्ञानेश राऊत, विक्रम रणवरे, भाग्यश्री दोशी, सारिका राऊत, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हांगे, प्रस्ताविक दैवत वाघमोडे तर आभार प्रदर्शन पाटील यांनी केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.