स.मा.वी.च्या 3 संघांची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
स.मा.वी.च्या 3 संघांची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(तात्यासो शिवाजी काटकर)
अकलूज दिनांक 02/09/2023 : माळीनगर येथे संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या 3 हॉलीबॉल संघांना प्रथम क्रमांक मिळून त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी अकलूज वैभव ला सांगितली.
माळीनगर येथे जिल्हा क्रीडा विभाग सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय व्हाॅलीबाॅल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील एकूण ३४ शाळेच्या संघांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा १९ वर्षांखालील मुले व मुली व १४ वर्ष मुली अशी खेळवण्यात आली.
मानवाचे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक खेळ खेळले जातात. बुद्धी बरोबर शारीरिक कौशल्य दाखवणारा हा खेळ. स्पर्धात्मक खेळाडूंना अनेक मूलभूत कौशल्ये पार पाडणे आवश्यक असते.अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाने तीनही स्पर्धेत सहभाग घेतला त्यामध्ये 19 वर्ष मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक, तसेच 19 वर्ष मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक व 14 वर्ष मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या तिन्ही संघाची निवड तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता झाली आहे. विजयी संघातील सर्व खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील आणि संचालिका कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील, माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून भावी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यास्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी केले. तसेच मार्गदर्शक शिक्षक भिमाशंकर पाटील, संजय राऊत, उमेश भिंगे, तानाजी शिंदे, दुधाळ याचेही अभिनंदन केले. उप मुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.