कै.ज्ञानदेव नामदेव घुले यांच्या सावडलेल्या रक्षेवर वृक्षारोपण
कै.ज्ञानदेव नामदेव घुले यांच्या सावडलेल्या रक्षेवर वृक्षारोपण
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 29/6/2023 : पाटीलवस्ती बागेचीवाडी येथील वयोवृद्ध शेतकरी ज्ञानदेव नामदेव घुले यांचे सोमवार दिनांक 26 जून रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या अस्थि सावडण्याचा विधी बुधवारी सकाळी झाला. सावडलेल्या रक्षा नदीच्या पाण्यात विसर्जन करण्याच्या पारंपारिक रुढीला छेद देत मयत घुले यांचा मुलगा मारुती ज्ञानदेव घुले यांनी सदर सावडलेल्या रक्षा जमिनीत खड्डा घेऊन त्यात विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण करण्याचा मनोदय व्यक्त केला.
त्यानुसार खोल खड्डा घेऊन त्यामध्ये रक्षा विसर्जित केली. नंतर त्यामध्ये श्रीमती जिजाबाई ज्ञानदेव घुले, श्रीमती रतन शंकर सलगर, मारुती ज्ञानदेव घुले, सौ. मनिषा मारुती घुले, सौ. रुक्मिणी नानासाहेब काळे, भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, संतोष भगवान खरात, धनराज मारूती घुले इत्यादींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कै.ज्ञानदेव घुले यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी सकाळी अकलूज येथे अकलाई घाटावर होणार आहे.