आपला जिल्हासहवेदना

चांदसाब मिठू सय्यद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

चांदसाब मिठू सय्यद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 29/6/2023 : राऊतनगर – अकलूज येथील चांदसाब मिठू सय्यद (वय 60 वर्षे) यांचे बुधवार दिनांक 28 जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे सर्व विधी मुळगाव राजुरी तालुका जुन्नर येथे होणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी,1 मुलगा, 2 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे 34 वर्षे तंत्र निदेशक म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. त्यांचे मूळ गाव
राजुरी,ता. जुन्नर, जि. पुणे होय. मुस्लिम धर्माबरोबरच हिंदूंचे सण, देवदर्शनाची त्यांना आवड होती. राऊत नगर येथील मशीद बांधण्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला.मुलगा नेव्ही मध्ये असून सध्या तो अमेरिकेत आहे.
सय्यद यांच्या आकस्मित निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.