आपला जिल्हाराजकीय

अजितदादा व भाजपा साठी जन मताची वाट अवघड का बनत आहे?

अजितदादा व भाजपा साठी
जन मताची वाट अवघड का बनत आहे?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 21/7/2023 :
महाराष्ट्रातील राजकीय सत्ता बहुसंख्यांक असलेल्या” मराठा “समाजा भोवती फिरते , त्यात ही स्वांतत्र्य काळापासून या समाजातील सत्ता केंद्रा कडे सहकार चळवळीने अर्थ सत्ता दिल्या नंतर राज सत्ता , सामाजिक सत्ता व अर्थ सत्ता याने भक्कम असलेला राज वर्ग निर्माण झाला , आणि भारतीय लोकांच्या मानसिकतेने वारसा हक्कां तून याच याच घराण्यातील लोक सत्ताधीश बनत आले.
तुलनेने लोकसंख्येच्या बाबतीत “धनगर”समाज तितकाच प्रबळ असताना ही अर्थ सत्ते अभावी , आणि सामाजिक पातळीवरील बहुजनतील बहुतेक जाती यांनी क्षत्रिय समाजाची सत्ता मान्य केल्याने हा समाज सर्व वर्गाचे नेतृत्व करण्यात कमी पडला.
गैर मराठा राजकारणाला आव्हान देऊ शकणारी हिंदुत्व वादी विचारसरणीच्या जवळ ओबीसी वर्ग आणि हिंदू तील एस सी ,एस टी, सत्ता विहीन वर्ग एकवटला आणि हळू हळू हा वर्ग “मराठा” सत्तेला आव्हान निर्माण करू शकला.
या हिंदुत्वाचा वैचारिक कणा हा “ब्राम्हण”समाज राहिला. सामाजिक दृष्ट्या या वर्गाचे नेतृत्व स्वीकारण्यात जातीय अंहभाव आडवा येत नसल्याने समाजातील सर्वच जाती , जमाती यांनी अगदी मराठा समाजातील वर्गाने ही या राजकीय विचारधारेला पर्यायी सत्ता केंद्र म्हणून स्वीकारले.
महाराष्ट्रातील इतर जाती समूहा ने निर्माण केलेल्या पक्ष किंवा संघटना कडे नजर टाकली तरी आपणास ही बाब स्पष्ट दिसते की , महादेव जानकर यांनी रा स पा सारखा पक्ष निर्माण करून ही त्याचा कणा हा धनगर समाजाचा च राहिला , किंवा रिपाइ सारखे पक्ष निर्माण होऊन ही या पक्षाचा मुख्य जनाधार हा नवबौध्द समाज च राहिलेला दिसतो.
काँग्रेस पक्षाच्या 10वर्षाच्या राजवटी नंतर जो नकारात्मक भाव समाज व्यवस्थेत निर्माण झालेला होता , आणि खंडप्राय देश असून ही दहशत वाद , अल्पसंख्यांक समाजाची प्रचंड काळजी घेणारे सरकार , सोबतीला भ्रष्टाचार आणि सिमे वरील जवानाच्या हत्या आणि विटंबना याने हा देश कमजोर बनलेला आहे , व या देशाला एका कणखर नेत्याची गरज आहे ही भावना वाढीस लागल्याने , हिंदू रक्षक या भूमिकेतून मोदी जी यांचे आगमन झाले. आणि हा नेता जशास तसे उत्तर देईल , असा विश्वास जनतेला वाटला आणि 2014 पासून आज तागायात ते सत्तेत आहेत.
परंतु त्यांचे आर्थिक क्षेत्रातील अनेक प्रयोग , जी एस टी , प्रचंड महागाई , आणि वाढलेली बेरोजगारी सर्व सामान्य माणसाला जाचक वाटू लागली , आणि त्यांच्या लोक प्रियतेचा आलेख हळू हळू खालच्या दिशेने झुकू लागला.
भारतीय राज सत्तेवर निरंकुश सत्ता स्थापित करण्याचा प्रयोग म्हणून विरोधी पक्षातील प्रमुख नेतृत्वावर तपास यंत्रणा , आणि आर्थिक संस्था यांच्या चौकशी चां ससेमिरा लाऊन एकतर्फी कारवाया नी जोर पकडलेला असताना ही भारतीय जनतेने त्यावर फारशी नाराजी दर्शवली नाही. याचे कारण राजकारणाचे शुध्दीकरण म्हणून जनतेने या कडे पाहिले.
परंतु हळू हळू , प्रसार माध्यमे , न्याय पालिका , आणि निवडणूक आयोग व प्रशासकीय अधिकारी भाजप अनुकूल वर्तन करू लागले.
तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी संभाव्य जाचातून मुक्ती मिळावी म्हणून भाजपची वाट पकडली.
तेंव्हा हा गढूळ प्रवाह इतका मोठा होता की या प्रवाहात मूळ भाजपाचा चेहरा च हरवून गेला.
ज्या संघ परिवाराच्या स्वंयसेवक औवर्गाने काँग्रेस मुक्त देशाचे स्वप्न पाहिले , आदर्श राम राज्याची स्वप्न पाहिली याचे उलट भाजपात ही याच वर्गाचे नेते दिसू लागले , औआणि मूळ लोकांचा आवाज क्षीण झाला.
किमान 50वर्ष निरंतर सत्ता हे ध्येय ठेऊन गैर भाजपा पक्षातील नेत्यांना भाजपा ने जवळ करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रातील “माधव”
माळी +धनगर+ वंजारी हा प्रयोग थांबवून त्यांनी काँग्रेस ला हरवण्या साठी मराठा प्रमुखांना जवळ करण्यास सुरुवात केली.
महादेव जानकर , सदाभाऊ खोत , पंकजा मुंढे अश्या नेत्यांचे प्रस्थ कमी झाले. आणि त्यांच्या जागी राणे , विखे पाटील , अश्या नेत्यांची वर्णी लागली. परंतु यातील एक ही नेता महाराष्ट्र पातळीवर स्वतः चे नेतृत्व स्थापित करू शकला नाही.
म्हणून शिवसेनेला फोडून स्टाँग मराठा नेता म्हणून एकनाथराव शिंदे यांना मित्र म्हणून जोडून घेतले. परंतु त्यांचे वर आणि त्यांच्या साथीदारांवर “गद्दार”हा शिक्का बसला.
महाराष्ट्रातील जनता ही भावनिक आहे. आणि ती अन्याय निमूटपणे पाहू शकत नाही. या मुळे आज ठाकरे घराण्या भोवती सहानुभूती दिसून येते आहे.
आणखीन काय करता येईल? या शोधा त असलेल्या भाजपा चे चाणक्यांना राष्ट्रवादी काँग्रेस चां आणखी एक मोठा मासा गळाला लागला तो अजितदादा यांचे रूपाने. अजितदादा यांचा शीघ्र कोपी स्वभाव शरद पवार जाणत च होते.
आपल्या पक्षाचे उत्तराधिकारी कोण असावेत हे पवार यांनी निश्चित केले होते. म्हणूनच त्यांनी पार्थ पवार यांना अधिक महत्त्व न देता , रोहित पवार यांना पुढे आणले. सुप्रियाताई यांना कार्याध्यक्ष करून त्यांच्या सत्तेला मजबूत करण्यासाठी जयंतराव पाटील , आणि जितेंद्र आव्हाड यांचे सारखे नेते ठेवले ,
अजित दादा यांचे हातात कोणतीच पक्षीय सत्ता न ठेवल्या ने आपल्या सोबत पक्ष नाही याची खंत अजितदादा यांना होतीच , आणि साहेबांनी “राजीनामा नाट्य “घडवून आणून अजित दादा यांना समाज माध्यमे आणि जनते समोर उघडे पाडले.
यातून ही शेवटी अजितदादा यांनी बंड घडवून आणले. पण दादा समवेत नेमके किती आमदार आहेत? याचा अंदाज येत नाही , आणि पक्षांतर कायद्याच्या कचाट्यात हे बंड सापडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पण हा आपला विषय नाही , अजितदादा येण्यामुळे भाजपा कडे मतदार झुकला आहे काय? याचे उत्तर फारसे समाधान कारक नाही.
याचे कारण भाजपचे सत्ते विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस , संभाजी ब्रिगेड व त्यांचे कार्यकर्ते, खा. डॉ. अमोल कोल्हे , ते आ. अमोल मिटकरी यांनी शिवराज्य यात्रा काढून जो ब्राह्मण ~ब्राम्हणेतर वाद निर्माण करून सामाजिक विभाजन घडवून आणले आहे, ब्राम्हणी सत्तेला शिवरायांचे विरोधक , कारस्थानी “अनाजी पंत ” वर्ण वर्चस्व वादी पेशवाई ही भावना वाढीस लावली ती माणसांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.
दुसऱ्या बाजूला आंबेडकरी समाजातील ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने स्वाभिमानी बाणा म्हणून आणलेली “सत्ता ~वंचित”वर्गाची चळवळ जात मर्यादा तोडून इतर घटकांना ही कवेत घेऊन गेल्याने या माध्यमातून गैर भाजपा चळवळ विकसित झाल्याचे दिसून येत आहे.
या देशातील अल्पसंख्याक वर्ग तुरळक पद्धतीने भाजपा त पदाधिकारी असला तरी या पदाधिकाऱ्यांच्या मागे किती सामाजिक बळ आहे ? या बद्दल शंकाच आहे.
या सर्व परिस्थिती ने महाराष्ट्रात तरी हिंदुत्वाचा प्रवाह क्षीण झालेला आहे. आणि तो वाढवणे हे आव्हान पेलण्याची क्षमता दस्तुर खुद्द अजितदादा कडे ही आहे असे मला वाटत नाही.
पक्षांतर बंदी चे कायद्या मुळे अजितदादा व त्यांच्या समर्थकांना थेट भाजपा त विलीन व्हावे लागले तर भाजपा चां प्रचार कसा करायचा ? हे आव्हान त्यांच्या पुढे राहणारच आहे.
वैचारिक भिंती उल्लंघन करण्यासाठी वैचारिक शक्ती च लागते. हे काम राजकीय व आर्थिक शक्ती ने साध्य केले जाऊ शकत नाही. आणि याचीच कमतरता त्यांच्या सहकाऱ्या चे पूर्वाश्रमी चे वैचारिक लढाईने निर्माण केलेले आहे.
नको असलेला काटा पवार साहेबांनी चतुराईने पक्षा बाहेर घालवला. आणि फुले, शाहू , आंबेडकरी वाद , छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची त्यांनी केलेली मांडणी , अधिक वयस्क तेची सहानुभूती , अल्पसंख्याक , दलीत वर्गाची सहानुभूती , आणि बहुसंख्य मराठा समाजाचे आपलेपण याने ते सशक्त झाले आहेत.
या उलट अजितदादा हे भाजपा साठी मोठा धोंडा ठरतील की काय ? अशी ही शंका येत आहे.
आणि हे वास्तव भाजपा साठी भीषण आहे. फार मोठे प्रयास यशासाठी करावे लागतील हे मात्र तितकेच खरे आहे.

 

ऍड. अविनाश टी. काले
अकलूज -413101.
माजी राज्य सचिव सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस  तालुका माळशिरस,जिल्हा सोलापूर.
मो. नं. 9960178213

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.