थायलंड बरोबरच्या साखर करार म्हणजे ओंकार साखर कारखान्याची आंतरराष्ट्रीय भरारी – बाबुराव बोत्रे पाटील

“थायलंड बरोबरच्या साखर करार म्हणजे ओंकार साखर कारखान्याची आंतरराष्ट्रीय भरारी – बाबुराव बोत्रे पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 21/11/2025 : “थायलंड बरोबरचा साखर करार म्हणजे ओंकार साखर कारखान्याची आंतरराष्ट्रीय भरारी होय असे ओंकार परिवाराचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील यांनी म्हटले.
ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी गेल्या सात वर्षांपासून शेतकरी कर्मचारीवर्ग यांना केंद्र बिंदु मानुन काम केल्याने जागतिक पातळीवर ओंकार साखर कारखाना परिवाराने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण साखर निर्माण केल्याने थायलंड बरोबर 50 हजार टन साखरेचा करार करण्यात यश आले. परकीय चलन मिळण्यास परिवारास यश लाभले. या अगोदर ही इथेनॉलचा आंतरराष्ट्रीय कंपन्याबरोबर करार झाला शेतकऱ्यांच्या, कर्मचारीवर्गांच्या दृष्टीने साखर उद्योगातील मोठे पाउल मानले जाते.
आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय साखरेचा करार झाल्यानंतर बद्दल चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचे सर्व जनरल मॅनेजर, खाते प्रमुख, कर्मचारीवर्गांने ऊस उत्पादक शेतकरी वाहन मालक बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.
शेतकरी, कर्मचारीवर्ग यांच्या विश्वासार्हतेमुळे आपण आंतरराष्ट्रीय भरारी मारू शकलो असे याप्रसंगी चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी म्हटले.