सहकार महर्षी कारखान्यामध्ये 1 लाख 51 हजार 151 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न

सहकार महर्षी कारखान्यामध्ये 1 लाख 51 हजार 151 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 21/11/2025 :
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-2026 चा 64 व्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या 1 लाख 51 हजार 151 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगतीपथावर वाटचाल चालू आहे.
कारखान्याचा गळीत हंगाम 2025-2026 हा अखंडितपणे पुर्ण क्षमतेने सुरू असून आज अखेर 1 लाख 85 हजार 064 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 1 लाख 51 हजार 151 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. सध्या प्रतिदिन सरासरी 8,500 मे.टन प्रमाणे ऊसाचे गाळप चालू आहे.
या सिझनमध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाला असून दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी अखेर 1 कोटी 47 लाख 45 हजार 960 युनिट वीज निर्माण झाली असून त्यामधून 89 लाख 94 हजार 200 युनिट वीज विक्री केलेली आहे.
तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टिलरी मध्ये दि. 20 नोव्हेंबर 2025 अखेर 22 लाख 85 हजार 748 लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट तसेच 19 लाख 30 हजार 6 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असल्याची माहिती कारखान्याचे सेक्रेटरी अनिल काटे यांनी दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, ॲड.विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागिरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, गोविंद पवार, डॉ.सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक ॲड.प्रकाशराव पाटील रामचंद्रराव सावंत-पाटील संचालिका सौ.सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजीत रणनवरे माजी संचालक भिमराव काळे, महादेवराव घाडगे, रामचंद्र चव्हाण, सुनिल एकतपुरे, महादेवराव चव्हाण, चांगदेव घोगरे, राजेंद्र मोहिते, महाळूंग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे, शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडिया लेजर शो कमिटी संचालक बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे, श्रीकांत बोडके, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर साखर पोती पूजन प्रसंगी कारखान्याच्या संचालिका, कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत चिफ केमिस्ट एस.एन.जाधव व सत्कार चिफ इंजिनियर एस. के. गोडसे यांनी केला.