“शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेळेत पैसे देण्या साठी मी कटीबद्ध”- बाबुराव बोत्रे पाटील

“शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेळेत पैसे देण्या साठी मी कटीबद्ध”- बाबुराव बोत्रे पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 15/11/2025 :
“शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेळेत पैसे देण्या साठी मी कटीबद्ध आहे” असे ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी म्हटले.
सोलापूर जिल्ह्यात ओंकार कारखाना चांदापुरी ने सोलापूर जिल्ह्यात उसाला उच्चांकी दर दिल्याबद्दल बाबुराव बोत्रे पाटील यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते.

ओंकार साखर कारखाना परिवाराने सन 2024-25 सिझन मधील गाळप केलेल्या ऊसास सोलापूर जिल्ह्य़ात ऊच्चांकी बाजार भाव प्रति मेट्रिक टन रुपये 3005/- व फेब्रुवारीत गाळप झालेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन रुपये 3105/- दर दिला. ऊस वाहतूकदारांची बीलेही वेळेत दिली. तसेच दिपावली साठी ऊसाच्या प्रमाणात ऊस उत्पादकांना मोफत साखर दिल्याबद्दल चेअरमन बाबुरावजी बोत्रे पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे पाटील यांचा वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला. ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी वर्ग, वाहन मालक, यांना केंद्र बिंदु मानुन काम केले. गेल्या सहा वर्षांपासून जो शब्द दिला त्या मध्ये कोणाताही बदल केला नाही. शेतकरी रामभाऊ मगर व राहुल मगर यांच्या हस्ते झालेल्या या सन्मान सोहळ्यात प्रसंगी पदाधिकारी, खाते प्रमुख, बहुसंख्य शेतकरी, वाहन मालक, कर्मचारी उपस्थित होते.
