ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 15/11/2025 : हे एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे आहे. सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शेतीपासून अवकाशापर्यंत जगात सर्वत्र आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान उपयोगी पडते आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून अंधश्रद्धांवर मात केली गेली पाहिजे. आपले रितीरिवाज, परंपरा पाळत असताना यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्या.
असे असले तरी आपल्या दृष्टीने नैतिक मूल्ये सुद्धा महत्वाची आहेत. आपले ज्ञान कितीही वाढत गेले तरी त्याला संस्कारांची, नीतिमूल्यांची जोड महत्त्वाची आहे. त्याशिवाय जीवन व्यर्थ आहे.
मुलांनो, शिका ज्ञानी व्हा, जोडीला संस्कारी व्हा.
सौ. स्नेहलता स. जगताप
