मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 15/11/2025 :
आपले “रिकामे मन हे सैतानाचे घर असते” असे म्हटले जाते. याचा आपल्याला नेहमीच अनुभव येतो. काही काम नसले आणि नुसते बसलेलो असलो की नको ते विचार मनात पिंगा घालतात.
बरे ते विचार सकारात्मक, मनाला आनंद देणाऱ्या आठवणी असतील तरी ठीक. पण नेमके नको त्या गोष्टी आठवतात. पूर्वी, भूतकाळात घडून गेलेल्या मनाला त्रासदायक अशाच गोष्टी आठवतात व पूर्ण वर्तमानकाळ बिघडवून टाकतात.
त्यामुळे आपण जास्तीत जास्त कामात व्यग्र असतो ते योग्य ठरते. आपले दैनंदिन काम, नोकरी, व्यवसाय या व्यतिरिक्त अजून मोकळा वेळ रहात असेल व तो त्रासदायक ठरत असेल तर काहीतरी छंद जोपासणे फायदेशीर ठरते.
आजचा संकल्प
मनात नकारात्मक विचारांना स्थान न देता, चांगल्या गोष्टी आठवण्याची सवय लावून घेऊ. स्वतःला सतत गुंतलेले ठेवू. निखळ मैत्री किंवा आवडीचे छंद जोपासू व आनंदी राहू.
सौ. स्नेहलता स. जगताप
=========/===========
