पुणे पदवीधर मतदार नोंदणी २०२६ : वाढीव अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025

पुणे पदवीधर मतदार नोंदणी २०२६ : वाढीव अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 20/11/2025 :
पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या 2026 निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, 10 डिसेंबर 2025 ही वाढीव तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पात्र पदवीधरांनी वेळेत नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रा. अजय गाढवे यांनी आवाहन केले आहे.
प्रा. अजय गाढवे म्हणाले, “पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित मतदारांचा आवाज असून, धोरणात्मक आणि विकासाभिमुख निर्णय प्रक्रियेमध्ये या मतदारसंघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र पदवीधराने या महत्त्वाच्या निवडणुकीत आपला हक्क बजावण्यासाठी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे.”
नोंदणीसाठी आवश्यक बाबी
१.आधार कार्ड/मतदान कार्ड
२.पदवी प्रमाणपत्र/निकाल पत्रक
३.नावात बदल असल्यास गॅझेट
— नोंदणी प्रक्रिया —
पदवीधरांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन (www.mahaelection.org.in) मध्ये अर्ज सादर करून नोंदणी पूर्ण करता येईल.
पहिल्या टप्प्यातील 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची प्रारूप मतदार याद्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे असे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.
प्रा. अजय गाढवे यांनी सर्व महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, व्यावसायिकांना तसेच इतर क्षेत्रात काम करणारे पदवीधर आणि आपल्या सहकाऱ्यांनाही नोंदणीसाठी प्रोत्साहित करत आहेत तसेच नोंदणी करण्यास मदत करत आहे आणि अजूनही जे राहिलेले आहेत त्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
