आपला जिल्हाधार्मिकप्रेरकमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

वारी म्हणजे माणुसकीची शाळा.

आषाढी एकादशी व वारी निमित्त विशेष अथिती संपादकीय………✍️

वारी म्हणजे माणुसकीची शाळा.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 28/6/2023 : वारी म्हणजे माणुसकीची शाळा.वारीला यायचं ते नुसतं पांडुरंगाला भेटायला नाही. ते तर कधीही येऊ शकतो. इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो. माणसं कळायला लागतात. आपण कुठे आहोत ते ही समजतं. एकमेकाशी गप्पा करताना लोकांची दुःख कळतात. मिळून मिसळून एकमेकाच्या मदतीने काम करायची सवय लागते. दुसऱ्याला सांभाळून कसं घ्यायचं हे कळतं. वारी म्हणजे माणुसकीची शाळा असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार गळून जातो. मी कोणीतरी मोठा आहे खास आहे ही भावना मनात रहात नाही. आणि विठू माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं !
इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात. दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी रहाते. आणि मग आपोआपच नम्रपणा येतो अंगात.” स्वतःचं मूळ विसरायचं नसेल तर माणसानं वारी नक्की करावी”
महाराष्ट्राला रूढी, परंपरा, सण,समारंभ, सोहळे, उत्सव नवीन नाहीत पण लोकजिवनामध्ये अधिष्ठीत असलेल्या दैवताच्या पंरपरा. इथल्या मनाला जास्त रुंजी घालतात. त्यातुनच खंडोबा, जोतीबा, विठोबा हि लोकमानसातली दैवतं.


गेली अनेक शतके पंढरीच्या पांडुरंगाची वारी हा सन्मानाचा, रूढी परंपरेचा पालखी सोहळा. हि परंपरा का निर्माण झाली यापेक्षा सामान्याच्या जीवनात यामुळे काय बदल होतात हे पाहणे आगत्याचे ठरेल.
आस्तिक का नास्तिक यापेक्षा वास्तविक असणे जास्त महत्वाचे आहे, यातुनच समाज जीवनाला सकारात्मक बनविणाऱ्या, ताजेतवाने करणाऱ्या संकल्पना आग्रहाने स्विकारण्याचे प्रयत्न केला पाहिजे याचाही अट्टहास धरायलाही हरकत नाही.
सर्व वारकरी बंधू हे वारी कालावधीत जात, धर्म विसरून एकत्रीत येतात. समुह जीवनातल्या या एकात्मतेचा पाया पंढरीची वारी घालते.
वारी काळात पडणाऱ्या कष्टाची कसलीही पर्वा न करता वारी पुर्ण करतात. याचा फायदा वारकरी बांधवांना पुर्ण आयुष्यात होतो. समोर कोणताही प्रसंग उभा ठाकला तरी त्यातुन तो निभावून नेण्याची ताकद वारीमुळे त्यांच्यात येते.
वारीमध्ये आल्यावर का़य मिळते या प्रश्नाचे एकच उत्तर आनंद …यातुनच केवळ समाधान आणि समाधान. मिळणारा निर्भेळ आनंद उर्वरित आकरा महिन्यासाठी पुरतो.
संत सहवासाचं सानिध्य व हरीनामाचा गजर या दोन्ही गोष्टी आत्मशुध्दीसाठी आध्यात्माने मान्य केलेल्या आहेत. त्या या कालावधीत मिळतात. म्हणूनच सोबत घेतलेल्या गोळ्याची ( मेडिसीनची ) त्यांना गरज पडत नसावी.
मुळातच वारकरी संप्रदाय हा साचेबध्द, कर्मट , सनातन, धर्माच्या बाहेर जावून उत्कटतेने कैवल्याचा व मांगल्याचा विचार करणारा आणि समता मानणारा आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामीत्व आले आहे हे ही नाकारून चालणार नाही.
वारीत भक्ती तर आहेच त्याच्या जोडीला आध्यात्मिक ताकदीबरोबर सर्व काही विसरून फक्त एका अनामिक ताकदीच्या ( उर्जा ) ओढीने सुरू असलेली हि परंपरा समुह मनाला बांधून ठेवते.
महत्वाची गोष्ट प्रतिपादन करावी लागेल कि आपण सर्वजण स्वयंशिस्त व राष्ट्रशिस्त या बाबतीत खुप मागे आहोत, पण वारी काळामध्ये आढळनारी शिस्त हा संशोधनाचा व मानसिक परीक्षणाचा विषय आहे. अशी प्रचंड शिस्त दुसऱ्या कुठेही एव्हढ्या मोठ्या जमसमुदायामध्ये आढळत नाही.
दहा ते बारा लाख लाख लोक किमान एक महिनाभर चालत असतात त्यांना नियंत्रीत करण्याची आवश्यकता भासत नाही किंवा तसे काही प्रसंग घडल्याचेही आठवत नाही.
म्हणून वारी माणुसकीची शाळा ठरते…
… पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय…

अथिती संपादक डॉ विश्वनाथ आवड
शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज
9422028838

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.