ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 31/10/2025 :
विद्यार्थीदशेत असताना स्वतःच्या प्रगतीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. अभ्यास, विविध स्पर्धा, क्रिडा-कला स्पर्धा यामध्ये प्राविण्य प्राप्त करण्यासाठी आपण जिद्दीने सराव करत असतो.
आपण नेहमीच अग्रक्रमावर असावे, पारितोषिके मिळवावित असे प्रत्येकालाच वाटते. काहींना स्पर्धेची नशा चढते. आपणच नेहमी प्रथम असावे असे वाटते त्यामुळे इतरांशी नकळत चुरस वाढते.
मुलांनो, स्पर्धेत सहभागी व्हा पण निकोप मनाने. बरोबरच्या विद्यार्थ्यांना कमी समजू नका किंवा त्यांचा हेवा करू नका. कोणी कमी असेल कोणी जास्त पण मित्रत्वाने रहा. एकमेकांना सहकार्य करा, मार्गदर्शन करा.
हातात हात घेऊन मिळून पुढे जाण्यात जो आनंद आहे तो एकट्याने पळण्यात नाही.
सौ. स्नेहलता स. जगताप

