सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भव्य राज्यस्तरीय डे-नाईट लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भव्य राज्यस्तरीय डे-नाईट लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 08/01/2026 :
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड रिसर्च, शंकरनगर अकलूज आयोजित डे-नाईट लिग टेनिस बॉल क्रिकेट (क्रिकेट महासंग्राम२०२५) स्पर्धेचे अंतिम सामने दि. ७/१/२०२६ रोजी महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या क्रिडांगणामध्ये संपन्न झाले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले, सीताराम महाराज सहकारी साखर कारखाना खर्डीचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे उपस्थित होते.
सदर स्पर्धेत संस्था निहाय गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख ५१०००/-रु. व चषक सीताराम महाराज सहकारी साखर कारखाना संघ खर्डी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख ३१०००/- रु. व चषक जलसंपदा विभाग संघ अकलूज, तृतीय पारितोषिक रोख २१०००/- रु. व चषक डी. वाय. एस. पी. संघ अकलूज व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक रोख ११०००/- रु. व चषक सिंहगड इंजीनियरिंग कॉलेज संघ कोर्टी यांनी पटकावले.
गाव निहाय गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५१०००/-रु. व चषक अमर रिसवडकर इलेवन क्रिकेट क्लब संघ दत्तनगर खंडाळी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३१०००/- रु. व चषक सयाजीराजे इलेवन संघ निमगाव(म.), तृतीय पारितोषिक २१०००/- रु. व चषक गहिनीनाथ प्रतिष्ठान संघ माळीनगर व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक ११०००/- रु. व चषक यंगस्टार्स संघ पंढरपूर यांनी पटकावले.

संस्था निहाय गटामधून उत्कृष्ट फलंदाज पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर संघ कल्याण रजपूत व गाव निहाय गटातून अक्षय बोडरे सयाजी राजे इलेवन संघ निमगाव(म.) उत्कृष्ट गोलंदाज संस्था निहाय गटामधून डॉ. चैतन्य टेके आयुर्वेदिक महाविद्यालय अकलूज संघ व गाव निहाय गटातून अभिजित पवार अमर रिसवडकर इलेवन क्रिकेट क्लब संघ दत्तनगर खंडाळी तसेच सर्वाधिक षटकार ११००० रु./- रोख पारितोषिक अभिजित पवार अमर रिसवडकर इलेवन क्रिकेट क्लब संघ दत्तनगर खंडाळी.
संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील व शिवाजीराव काळुंगे साहेब यांच्या हस्ते पारितोषिक व चषक देऊन बक्षिस वितरण संपन्न झाले .
सदरील स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सयाजीराजे पार्कचे व्यवस्थापक नरेंद्र धुमाळ, प्रा. प्रदीप पांढरे, प्रा. गौरव देशपांडे व प्रा. रविकांत देशमुख तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

