रत्नत्रय परिवारा तर्फे पत्रकार दिन साजरा

रत्नत्रय परिवारा तर्फे पत्रकार दिन साजरा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 07/01/2026 : सालाबाद प्रमाणे या ही वर्षी रत्नत्रय परिवारा मार्फत तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळशिरस पोलिस स्टेशनचे पी.आय.विकास दिंडोरे यांचे हस्ते रत्नत्रय स्कूल मांडवे या ठिकाणी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद अनंतलाल दोशी यांनी केले. प्रारंभी पी आय. विकास दिंडोरे, संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.





रत्नत्रय पतसंस्था व रत्नत्रय परिवार यांचे वतीने गेली 21 वर्षां पासून पत्रकारांचा सत्कार करण्यात येत आहे. यांचे कौतुक विकास दिंडोरे यांनी केले व रत्नत्रय परिवार करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला व सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पत्रकार करीत असलेल्या कार्या बद्दल कौतुक केले. कार्यक्रमासाठी तालुक्यातून 35 पत्रकार उपस्थित होते. या सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण वाघमोडे,प्रमोद शिंदे, विलास भोसले, बंडू पालवे, व श्रीनिवास कदम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण करताना अनंतलाल रतनचंद दोशी यांनी आपण सर्वजण आमचे परिवाराच्या पाठीमागे खंबीर उभा असल्यामुळे आम्ही हे सामाजिक कार्य करीत आहोत. हाती घेतलेले हे कार्य कायम करत राहणार आहोत असे ते म्हणाले तसेच पत्रकारांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पत्रकारांचे आरोग्य चांगले रहावॊ ही सदिच्छा व्यक्त केली.
पत्रकार दिनानिमित्त च्या पत्रकार सन्मान सोहळ्याचे नंतर संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी आणि त्यांच्या सौभाग्यवती मृणालिनी अनंतलाल दोशी या उभयतांच्या लग्नाच्या 51 व्या वाढदिवसा निमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला.
या वेळेस माळशिरस पोलिस स्टेशनचे पी आय विकास दिंडोरे, रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी,सौ. मृणालिनी अनंतलाल दोशी,
रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, प्रमोद दोशी
संचालक जगदीश राजमाने, रामदास गोफने, विलास साळुंखे, रत्नत्रय प्रशाला मुख्याध्यापिका देसाई इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक जगदीश राजमाने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कर्मचारी व रत्नत्रय स्कूलचे मुख्याध्यापिका व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

