ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 08/01/2026 :
स्वतः सकारात्मक विचार करून आपण आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करू या. जसे की आपले मित्र. त्यांचे पण विचार सकारात्मक असावेत. त्यामधून आपल्याला चांगल्या सवयी लागतात.
मागे खेचणारे, नकारात्मक विचारांचा प्रभाव असणारे, व्यसने करणारे, आई-वडिलांचे न ऐकणारे मित्र आपल्याला पण वैचारिक दृष्टीने मागे खेचतात. अशा वेळेस त्यांचे न ऐकता आपण त्यांना आपले ऐकण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
मुलांनो, मैत्री समान विचारांची असावी पण त्यातूनही कोणाचे विचार नकारात्मक असतील तर त्यांना आपल्या बरोबर सकारात्मक प्रवाहात आणणे हे आपले कर्तव्य आहे, हिच खरी मैत्री.
सौ. स्नेहलता जगताप

