मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक : 06/01/2026
आपल्याला सुखी व समाधानी राहण्यासाठी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. सर्व प्रथम नकारात्मक विचारांची जळमटे झटकून टाकली पाहिजे.
आपण सतत चिंताग्रस्त असतो, प्रत्येक गोष्टीत शंका असते. जे घडते ते स्वीकारायचे नसते. त्याविषयी तक्रार असते. कधी कधी काही गोष्टी मान्य नसल्या तरी नाईलाजाने स्वीकारतो अन् मग चीड चीड सुरू होते.
खरे तर आपल्या जीवनात जे हवे ते मिळवायचेच असा आग्रह असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. नशिबात असेल ते मिळेल अशी जर भूमिका असेल तर निराश होण्याचा प्रश्नच येत नाही.
आजचा संकल्प
स्वतः प्रयत्न करण्याऐवजी दुसरे कोणी आपल्यासाठी काहीतरी करावे ही अपेक्षा न ठेवता आपण स्वतः प्रयत्नशील राहू व यशस्वी होऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.
======================
