पत्रकार दिनानिमित्त आलेल्या असंख्य प्रेरक शुभेच्छां पैकी एक

पत्रकार दिनानिमित्त आलेल्या असंख्य प्रेरक शुभेच्छां पैकी एक
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
सन्माननीय जेष्ठ पत्रकार
मा.श्री. नायकुडे साहेब
आपणांस
सुप्रभात आणि सस्नेह नमस्कार
कोविडनंतरच्या आव्हानात्मक काळात पारंपरिक वृत्तपत्र व्यवसायावर आलेल्या अडचणीमुळे तुम्ही लेखणी थांबवली नाही तर वृत्तपत्र व्यवसायास नवसंजीवनी देत आपल्या लेखणीला वृत्तपत्रांबरोबरच नव्या माध्यमांची वाट करून देत पत्रकारितेचा धर्म जपला. ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे.
बदलत्या माध्यमांतही सत्य, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजाची जडणघडण व समाजमनाचा आरसा होण्याचे कार्य तुम्ही प्रामाणिकपणे केले आहे आणि करत आहात.
पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी ओळख..
वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमातून *ग्रामीण प्रश्नांना वाचा फोडणारी तुमची लेखणी लोकशाही अधिक सशक्त करणारी आहे.
तंत्रज्ञान बदलले माध्यमे बदलले तरी भूतकाळ, वर्तमान व भविष्याचा वेध घेत चांगल्या वाईट सामाजिक घटनांचे वास्तव पुणे मांडत “समाजासाठी उभे राहण्याची जिद्द हीच आपल्या पत्रकारितेची खरी ओळख आहे”.
आपली पत्रकारितेची ही ओळख अधिक तेजस्वी व प्रेरणादायी ठरो हीच
आज पत्रकार दिनानिमित्त आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
आणि
वृत्तपत्रांबरोबरच ब्लॉग व सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेचा दिवा तेवत ठेवणाऱ्या आपणा सहित सर्व पत्रकारांना मानाचा मुजरा..
:-
गजानन रजनी ज्ञानेश्वर जवंजाळ
भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज

