ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक : 06/01/2026
लहानपणापासून आपण नेहमी आपले आई-वडील-गुरुजनांशी कृतज्ञ रहावे अशी आपल्याला शिकवण मिळते. दररोज त्यांना नमस्कार करावा, चरण स्पर्श करावा हा संस्कार आपण जपला पाहिजे.
यांच्या जोडीला ज्याने शेत पिकवल्यामुळे आपण उदरभरण करू शकतो तो शेतकरी व कसलाही विचार न करता आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतो तो सैनिक आपल्याला वंदनीय आहेत.
मुलांनो, “जय जवान, जय किसान!” ही फक्त घोषणा देऊ नका. रात्रंदिवस उन्हात राबणाऱ्या शेतकरी बांधवांचे व ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता कुटुंबाला दूर ठेवून देशाच्या सीमेवर खडा पहारा देणाऱ्या सैनिक बांधवांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही.
त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कुटुंबियांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.
सौ. स्नेहलता स. जगताप.
