ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/01/2026 :
दैनंदिन जीवनात आपण साध्या साध्या गोष्टी जाणून घेऊया. अनेकदा किरकोळ गोष्टींवरून आपण नाराज होतो, हट्ट करतो. मनाप्रमाणे नाही मिळाले तर रडतो सुद्धा.
त्याऐवजी जे प्राप्त होईल त्यात आनंद मानला पाहिजे. जे नाही मिळाले ते अगदीच गरजेचे असेल तर भविष्यात मिळवू अशी जिद्द ठेवा, नसेल तर ते विषय तिथेच सोडून द्या.
मुलांनो, रडण्याऐवजी हसत रहा, आहे त्यात समाधानी रहा. कोणाची बरोबरी करू नका. स्पर्धा करायचीच असेल तर स्वतःबरोबर करा, स्वतःमध्ये बदल करा, स्वतःला घडवा.
यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार महत्वाचे आहेत.
सौ. स्नेहलता स. जगताप.
