मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/01/2026 :
आपल्या प्रत्येकाला आपले कोणी कौतुक केले किंवा प्रशंसा केली तर खूप आवडते. अर्थात कोणी मनापासून करतात तर कोणी वरवर करतात. कशीही असली तरी प्रत्येकाला ती आवडते हे नक्की.
आपण प्रशंसा सौंदर्याची करतो. कपडे, दागिने, गाडी, बंगला, घड्याळ-मोबाईल अशा वस्तूंचे कौतुक तुमची भौतिक श्रीमंती दाखवते. जितकी किंमत जास्त तितके जास्त कौतुक केले जाते.
पण खरी प्रशंसा करायची असेल तर ती गुणांची करावी. तुमचे शील, चारित्र्य, स्वभाव, संस्कार याची प्रशंसा होणे जास्त महत्वाचे. आपण त्यासाठी प्रयत्नशील असावे.
आजचा संकल्प
दिसण्यापेक्षा असणे महत्वाचे असते. तुमची वर वर दिसणारी श्रीमंती किंवा बडेजाव यापेक्षा तुमच्यात असणारे सदगुण महत्वाचे आहेत हे लक्षात घेऊ व ते वाढवण्याचा प्रयत्न करू.
सौ. स्नेहलता स. जगताप
=====================
