अकलूज येथे 20 व्या भव्य लेझीम स्पर्धेला प्रारंभ

अकलूज येथे 20 व्या भव्य लेझीम स्पर्धेला प्रारंभ
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक : 07/01/2026
अकलूज येथे संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधी साठी आयोजित केलेल्या वीसाव्या भव्य लेझीम स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला.

विजय चौक अकलूज येथे स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व अकलूजचे नूतन नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांचे हस्ते झाले.तर मैदान पूजन नगराध्यक्षा सौ.रेश्मा अडगळे यांचे हस्ते झाले.या वेळी दिपकराव खराडे पाटील, सहकार महर्षि कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव माने देशमुख,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, समित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, गोविंद पवार, रामचंद्र ठवरे, बाळासाहेब देशमुख, शि.प्र.मंडळाचे संचालक सुभाष दळवी,नारायण फुले, वसंत जाधव, बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे,निशा गिरमे यांचेसह परिसरात विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शाखा प्रमुख, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
सयाजीराजे मोहिते पाटील म्हणाले,सलग वीस वर्षे या स्पर्धेचे आयोजन करणे हे अभिमानास्पद असून यातून अनेक खेळाडू तयार झाले.त्यांची शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती निर्माण झाली.स्पर्धेसाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या.
प्रास्ताविकात सचिव संजय राऊत म्हणाले, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ग्रामीण खेळ,व कलेचे जतन व संवर्धन करणारे जयसिंह मोहिते पाटील व मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळांने आजपर्यंत ७० हजार पेक्षा अधिक लेझीम खेळाडू, प्रशिक्षक निर्माण केले आहेत. ग्रीनिज वर्ल्ड बुक मध्येही अकलूज च्या लेझीम खेळाची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेत प्राथमिकचे ५ , मुलांचे ३१ व मुलींचे २२ असे एकूण ५८ संघांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचा प्रारंभ सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्राथमिक संघाने खेळ सादर करुन झाला.
सुत्रसंचलन किरण सूर्यवंशी व विशाल दळवी यांनी केले.
स्पर्धेसाठी सर्व सदस्य परिरश्रम घेत आहेत.
*स्पर्धेतील प्राथमिक गटात*
महर्षि प्रशाला प्राथमिक विभाग शंकरनगर यांनी प्रथम क्रमांक , सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग यांनी द्वितीय क्रमांक व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक विद्यालय मांडवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
