भारतीय बौद्ध भिख्खूं समवेत “वॉक फॉर पीस” चा अँबेसेडर अलोका

भारतीय बौद्ध भिख्खूं समवेत
“वॉक फॉर पीस” चा अँबेसेडर अलोका
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक : 07/01/2026
सध्या अमेरिकेत भारतीय बौद्ध भिख्खूंनीं ,जागतिक शांततेसाठी पदयात्रा सुरू केली आहे. अमेरिकेतील टेक्सासपासून सुरू होऊन दहा राज्यातून ही शांततेचा संदेश घेऊन ही पदयात्रा 2300 km चा पायी प्रवास करून वशिंग्टन DC येथे जाणार आहे. ही पदयात्रा सध्या खूप चर्चेत आहे , याचे कारण ही तसेच आहे. या पदयात्रेच्या केंद्रस्थानी भारतीय मूळ वंशाचा एक ‘श्वान’ आहे. हा कुत्रा या भन्तेबरोबर अमेरिकेत पायी पदयात्रा करत आहे. आणि या कुत्र्याचे अमेरिकन नागरिक तितक्याच प्रेमाने स्वागत करत आहे. हा कुत्रा तिथे कौतुकाचा अन चर्चेचा विषय ठरत आहे. येथील नागरिक त्याला फार प्रेमाने वागवत आहेत.
या कुत्र्याचा रस्त्यावर अपघात झाला होता, हा बेवारस भटका कुत्रा बौद्ध भिख्खूंना मिळतो अन तो त्यांच्या सोबत ..;अमेरिकेत जागतिक शांती पदयात्रेत सामील होतो.
या कुत्र्याला “Aloka” असे नाव देण्यात आले आहे. अलोका हा शब्द संस्कृत भाषेतील आहे अन याचा अर्थ ‘प्रकाश, दिवा’ असा होतो. म्हणूनच या श्वान आज साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश अन ज्ञान प्रकाश द्यायला निघाला आहे.
आज जग हे विध्वंसक आशा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना या बौद्ध भिख्खू चा जगात शांती प्रस्थापित करण्यासाठीच प्रयत्न फार मोलाचा ठरतो आहे. अमेरिकन नागरिक याचे फार मनोभावे अन प्रेमाने स्वागत करत आहेत.
अलोका “वॉक फॉर पीस” चा अँबेसेडर झाला आहे.. याचे प्रयत्न नक्कीच सफल होतील हीच सदिच्छा…!
जगातील मानवांच्या ,प्राण्यांच्या आनंदी सुखाने जीवन जगण्यासाठी “जगाला युद्ध नको बुद्ध हवा” यासाठीची ही पदयात्रा सफल होवो..!
नमो बुद्धाय..!
नमो धम्माय..!
नमो संघाय..!
साधू…साधू..साधू…
अलोकाचे हे कार्य अनमोल आहे.*ळ
🦮 93 26 36 53 96 🦮
