गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/7/2025 : श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय, अकलूज येथे दिनांक 19 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम सेबी, बीएसआय, एएफएमआय ॲडव्हायझरी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचे महत्व याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील एन एस सी ट्रेनर अजित पाटील हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व, सेबी व शेअर मार्केटची माहिती तसेच गुंतवणुकीचे महत्त्व, आर्थिक सुरक्षितता व आर्थिक ध्येय साध्य करण्याचे मार्ग याविषयी मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या व्याख्यानातून आर्थिक नियोजन व गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले . तसेच श्री पाटील यांनी विद्यार्थिनींसाठी पावर पॉइंट प्रेझेंटेशनचे आयोजन केले होते . विद्यार्थिनींनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व त्यांच्याशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन देखील केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनीही विद्यार्थिनींना आर्थिक नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .भारती भोसले तसेच आभार प्रदर्शन कु. सईराणी रोकडे हिने केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रगती शेटे व कु. वैष्णवी भोळे यांनी केले. याप्रसंगी डॉ. राजश्री निंभोरकर व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.