ताज्या घडामोडी

रानभाजी – दिंडा

रानभाजी – दिंडा

शास्त्रीय नाव : Leea Macrophylla
कुळ : Leeaceae
स्थानिक नाव : ढोलसमुद्रिक

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/09/2024 : दिंडा ही प्रजात पश्चिम घाट, कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते.
औषधी गुणधर्म
# व्रणरोपक म्हणून दिंडा ही वनस्पती प्रसिध्द आहे.
# औषधात दिंड्याचे मुळ वापरतात.
# वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत.
# कंदाचा लेप नायट्यावरही प्रसिध्द आहे.
१) पाककृती
# साहित्य – दिंड्याचे देठ, कोणत्याही कडधान्याच्या भाजीचे साहित्य किंवा कोलंबीच्या कालवणाचे साहित्य.
# कृती – दिंड्याच्या झाडाचे देठ म्हणजे कोवळ्या फांद्या सोलुन तुकडे करुन शेवग्याच्या शेंगे प्रमाणे कडधान्यात घालतात तसेच कोलंबीच्या कालवणातही घालतात. बाजारात दिंड्याचे देठ विकायला येतात. देठ टोकाला थोडे लालसर असते किंवा कधी कधी पुर्ण लालसर असते.
२) पाककृती
# साहित्य – एक जुडी दिंडे, अर्धा वाटी मोड आलेले वाल, एक कांदा, सहा लसूण पाकळ्या, थोडासा गुळ, आमसुल/कोकम, दोन चमचे खिसलेले आले खोबरे, कोथिंबीर, फोडणीला मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, तेल.
# कृती – दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगा प्रमाणे दिसे पर्यंत सोला. नंतर चिरुन धुऊन घ्या. तेल एका कढईत गरम करुन मोहरी, जिरे व हिंग टाका. नंतर त्यात कांदा, लसुन टाका. गुलाबी झाल्यावर त्यात गरम मसाला व चिरलेली भाजी टाका. झाकण टाकून मंद आचेवर ठेवा. भाजी शिजल्यावर त्यात गुळ, कोकम, कोथिंबीर व ओले खोबरे, मीठ टाका.

संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.