श्री शंकर स. सा. का.लि. सदाशिवनगर कामगार सेवक पतसंस्था चेअरमनपदी ज्ञानेदव पवार, व्हा.चेअरमनपदी निनहाज शेख

श्री शंकर स. सा. का.लि. सदाशिवनगर कामगार सेवक पतसंस्था चेअरमनपदी ज्ञानेदव पवार, व्हा.चेअरमनपदी निनहाज शेख
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/02/2025 : श्री शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील व उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर सह साखर कारखाना लि.सदाशिवनगर च्या कामगार सेवक पतसंस्था मर्या. सदाशिवनगर च्या चेअरमनपदी ज्ञानेदव पवार, व्हा.चेअरमनपदी निनहाज शेख यांची निवड करण्यात आली. तर संचालकपदी रविराज जगताप, आनंदराव गायकवाड, कैलास कदम, दिलीप पाटील, अभिजित माने, राजाराम शेंडे, विजय करडे, सुषमा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया यादव यांनी केली. यावेळी श्री शंकर सहकारी कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख साहेब व कार्यकारी संचालक अभिजित डुबल, संचालक सुनील माने, आनंदराव देवकर उपस्थित होते.