ताज्या घडामोडी

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 19/06/2024 :

तिसऱ्यांदा पंतप्रधान पद सांभाळणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील एका कार्यक्रमातून देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी केला आहे. वाराणसीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मोदींनी बटन दाबून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे २००० रुपये वळते केले. यानुसार २० हजार कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात १ फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत २००० रुपयांचे १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आले आहेत. वर्षाला तीन टप्प्यांत ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. महाराष्ट्रात राज्य सरकारनेही ६००० रुपये शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.
असा चेक करा पीएम किसान योजनेचा स्टेटस
1. पीएम किसान योजना अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
2. त्यानंतर ‘Know Your Status’ वर क्लिक करा.
3. नंतर नोंदणी क्रमांक भरा.
4. यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा प्रविष्ट करा.
5. सर्व माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा.
6. आता तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
आता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan-ict@gov.in वर फार्मर्स कॉर्नरमधील हेल्प डेस्कला भेट देऊन समस्या सोडवू शकता. हेल्प डेस्कवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका. पुढील फॉर्म भरून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
याशिवाय तुम्ही तुम्ही हेल्पलाइन नंबर 0120-6025109, 011-24300606 वर कॉल करू शकता. तुम्ही PM किसान हेल्पलाइन नंबर 155261 वर कॉल करू शकता.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.