ताज्या घडामोडी

सार्थक चोरमलेस सीईटी परीक्षेत 99.18% गुण

सार्थक चोरमलेस सीईटी परीक्षेत 99.18% गुण

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 19/06/2024 :

सोलापूर जिल्ह्यातील उघडेवाडी वेळापूर( तालुका माळशिरस) येथील सार्थक भाऊसाहेब चोरमले यांनी बारावी परीक्षेनंतर इंजीनियरिंग प्रवेशाची पात्रता परीक्षेत 2024 यावर्षी 100 पैकी 99.18% गुण मिळवले. तसेच बारावी एच एस सी बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेत 89.83% गुण मिळवून विद्यालयात चौथा रँक व मुलात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सदाशिवराव माने विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक भाऊसाहेब चोरमले या शेतकरी कुटुंबातील जिद्दी, मेहनती विद्यार्थ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


” सार्थक ने नेत्रदिपक दुहेरी यश संपादन करून आई वडील, शिक्षण संस्था, गुरुजन वर्ग, गाव यांच्याबरोबरच धनगर समाजाचे नाव सार्थकी लावले आहे.” अशा शब्दात
वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन सल्लागार समिती राष्ट्रीय अध्यक्ष आणि एन यु बी सी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी विद्यार्थ्यांचे मामा राजेंद्र विठ्ठलराव गोरे यांच्या माध्यमातून सार्थक चोरमले यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.