ताज्या घडामोडी

“नामस्मरणाची धनसंपदा वारकऱ्यांच्या अंतकरणात ठाण मांडून बसलेली आहे”: ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर

“नामस्मरणाची धनसंपदा वारकऱ्यांच्या अंतकरणात ठाण मांडून बसलेली आहे”: ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे,

मुंबई दिनांक 23/6/2024 :

“नामस्मरण नावाची सर्वात मोठी धनसंपदा वारकऱ्यांच्या अंतकरणात ठाण मांडून बसलेली आहे. आणि मग अशा वारकऱ्यांना अनुदानाची काय गरज? असा प्रश्न ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांनी आमच्या प्रतिनिधी बरोबर भ्रमणध्वनी वरून संभाषण करताना उपस्थित केला आहे
सात देशांमध्ये ज्या त्या देशाच्या भाषेत किर्तन सेवा बजावणारे ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांनी सविस्तर पणे बोलताना पुढे म्हटले की, गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या दिंडीला वीस हजार रुपये अनुदान प्रस्ताव मांडलेला आहे की प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्यात येतील. वारस्तविक पाहता आमच्या ज्ञानोबा तुकोबारायांचा वारकरी संप्रदाय ऐश्वर्यवान आहे कारण,
का जे लळेयाचे लळे सरती। मनोरथांचे मनोरथ पुरती।जरी माहेरी श्रीमंत होती। तुम्हा ऐशी॥
आमचा वारकरी संप्रदाय श्रीमंत आहे. राजयाची कांता काय भीक मागे। मनाचिया जोगे सिद्धी पावे॥ वारकरी कधी लाचार नसतो कारण आमची ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय किंवा पांडुरंग परमात्मा आम्हाला काही कमी करत नाही. 700 वर्षापासून वारकरी संप्रदायाला दिंडीची परंपरा आहे. आळंदी ,देहू पासून पंढरपूर पर्यंत जाणारा वारकरी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होतो. विठोबा रुक्माई ,ज्ञानोबा तुकाराम, या गजराने स्वतःला विसरून जातो. नामस्मरण नावाची सर्वात मोठी धनसंपदा वारकऱ्यांच्या अंतकरणात ठाण मांडून बसलेली आहे. आणि मग अशा वारकऱ्यांना अनुदानाची काय गरज. 700 वर्षात कुठल्याही दिंडीला अन्नदानाची कमतरता भासली नाही. हजारो दानशूर आमच्या भक्तांची वाट पाहतात आणि मग या सरकारने हा प्रस्ताव का मांडावा, हे सरकार आम्हा वारकऱ्यांना लाचार तर बनवत नाही ना ? कधी कधी वाटतं आम्ही भाग्यशाली आहोत सरकारने हे करण्यापेक्षा आळंदी देहूपासून पंढरपूर पर्यंत व्यवस्थापन करावे, स्वच्छता प्रदूषण टाळावं ,वारकऱ्यांना मदत करावी, गावे प्रदूषण मुक्त करावी, मुक्कामाच्या ठिकाणी सोय करावी ,आरोग्य चांगलं राहावं म्हणून व्यवस्था असावी, पोलीस यंत्रणेपासून वारकऱ्यांचे रक्षण व्हावं, आळंदीपासून देहूपर्यंत रस्त्याच्या कडेला झाडे लावावीत अशी अनेक प्रकारे सोयी कराव्यात. चांगले नियोजन करावे पण वीस हजार रुपये अनुदान देऊन वारकरी संप्रदायात तेढ निर्माण होईल असे करू नये. आपल्या सरकारला विनंती आहे की अनुदान देण्यापेक्षा आळंदीला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं तीर्थ म्हणजे पाणी आणि मग आळंदी तीर्थक्षेत्र प्रदूषणाने अतिशय घाणेरडे बनलेले आहे म्हणून पहिल्यांदा आमच्या माऊलीची इंद्रायणी माता घाणीच्या साम्राज्यातून मुक्त करावी तसेच जिथे जिथे पालख्यांचा मुक्काम असतो त्या ठिकाणी स्वच्छतेचे नियोजन करावे तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशीला प्रदूषण मुक्त करावं. जर आळंदी येथील इंद्रायणी माता प्रदूषण मुक्त झाली तर लाखो वारकरी आळंदी गावातील रहिवासी व तमाम महाराष्ट्रातील येणारे भाविक निरोगी राहतील व होणाऱ्या रोगापासून मुक्त होतील म्हणून माझी महाराष्ट्र प्रशासनाला राज्य सरकारला विनंती आहे की आपण हे अनुदान देण्यापेक्षा आळंदीतील इंद्रायणी माता व पंढरपुरातील चंद्रभागा प्रदूषण मुक्त करावी म्हणजे येणाऱ्या अनुदानाचे पैसे प्रदूषण मुक्ततेला वापरावेत असं झालं तर महाराष्ट्रातील भाविक भक्त व वारकरी संप्रदाय हे उपकार कधी विसरणार नाहीत म्हणून अनुदानापेक्षा आपण इंद्रायणी माता प्रदूषण मुक्त कराल अशी आशा बाळगतो राम कृष्ण हरी आणि आपण जो प्रस्ताव मांडलेला आहे तो प्रस्ताव आत्ताच का मांडलेला आहे त्याच्या पाठीमागे राजकीय स्वार्थ तर नाही ना कारण तीन चार महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या ..विधानसभेचा फॉर्मुला आपण डोळ्यासमोर तर ठेवून हे काम करत नाही ना? मनाला दुःख वाटतं निदान शासनाने तरी माझ्या विचाराचा विचार करावा. असेही शेवटी बोलताना त्यांनी म्हटले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.