विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 09/01/2026 :
शालेय जीवनात आपल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या इच्छा असतात, ज्यांना आपण महत्त्वाकांक्षा म्हणू शकतो. त्या पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल हे पण आपल्याला माहित नसते, तरी मोठे झाल्यावर आपण काय करायचे हे आपण ठरवत असतो.
अनेकदा ठरवतो एक व घडते भलतेच असे पण होते. करिअरच्याच बाबतीत असे नाही. इतर पण इतर अनेक इच्छा असतात, काही छंद असतात. लहानपणीचे किंवा शालेय वयातील आवडी-निवडी मोठेपणी बदलू पण शकतात.
मुलांनो, योग्य-अयोग्य कळण्याच्या वयात घेतलेले निर्णय योग्य ठरतात. तोपर्यंत आपल्याला आपला आवाका लक्षात येतो. भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे काय आहे ते समजते. फक्त महत्वाचे हे आहे की ध्येय मोठे ठेवायचे अन् तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत रहायचे.
सौ. स्नेहलता स. जगताप.

