मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 09/01/2026 :
आपल्यावर जीवनात अनेक ऋण असतात. मातृ ऋण, पितृ ऋण व गुरु ऋण आपल्याला माहीत आहेत. आपण काहीही केले तरी ही ऋण फेडू शकत नाहीत हे पण आपल्याला माहित आहे.
याच्या जोडीला आपल्यावर कुटुंबाचे, नातलगांचे ऋण असतात. आपण कोणीच एकटे मोठे होत नसतो. त्यामध्ये आपल्या कुटुंबीयांचा व नातलगांचा सहभाग असतो. त्यांच्या शिवाय आपले मोठे होणे अशक्य असते.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्याने आपले शिक्षण, नोकरी, प्रवास, समाजातील वावर अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्यावर सामाजिक ऋण असतात. आपल्या जडणघडणीत सामाजिक परिस्थितीचा मोठा वाटा असतो.
आजचा संकल्प
आयुष्यात पुढे जाताना अनेकजण एकमेकांना पूरक असतात. कधी स्वभाव जुळतात कधी वितुष्ट येते. तरीसुद्धा आपण एकमेकांशी जुळवून घेत कृतज्ञतेने जाणीव ठेवू व मार्गक्रमण करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

