मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 10/01/2026 :
आपले विचार इतके उच्च व अनुकरणीय असावेत की इतरांनी त्याच्यावर नक्कीच विचार करावा. नुसता विचार करून थांबू नये तर तो विचार आचरणात आणावा व समाजात त्याच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडावा.
आपले सद्विचार आपल्याला सद्वर्तन करण्याची प्रेरणा देतात. मनात चांगले विचार असल्याशिवाय चांगले वर्तन घडत नाही. समाजात जितकी सदाचारी लोकांची जास्त संख्या तितका समाज संस्कारी समजला जातो.
आपला देश, हिंदुस्थान विश्वात सर्वांच्या पुढे एक विशिष्ठ आदर्श घेऊन उभा आहे. देशाला इतिहास आहे तशी आदर्श संस्कृती आहे. संत-महंतांची शिकवण, थोर महात्म्यांचा आदर्श जितका मोठा आहे तसे सर्वसामान्य जनतेचे संस्कार व सदाचार देशाचे रक्षण करतात.
आजचा संकल्प
आपल्या सद्विचार व सदाचाराने आपण आपली संस्कृती टिकवून ठेवू व एका विचाराने राहून जागतिक पातळीवर देशाचे अखंडत्व अबाधित राखू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

