ताज्या घडामोडी

आता सट्टा खेळायचा असेल तर अजितदादांवर बेलाशक खेळा

आता सट्टा खेळायचा असेल तर अजितदादांवर बेलाशक खेळा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे

मुंबई दिनांक 18/06/2024 :

आता सट्टा खेळायचा असेल तर अजितदादांवर बेलाशक खेळा
लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्या चित झालेले अजितदादा पवार हे आजकाल भाजपसोबत ओरिजनल शिवसेना नकोसे झाले आहेत कारण त्यांची वरात मुंबईतील देवगिरी बंगल्यावरून एक वर्षापूर्वी निघाली खरी पण त्यात जे मंत्री पदाचे घोडे उधळत होते त्यांची नाल कुठे सटकली का अडकली हे देव जाणो , आता भाजपचे बहुतांश आमदार काय किंवा कार्यकर्ते काय इतके त्या पक्षाला जाम वैतागले आहेत की काय विचारूच नका .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच अजितदादां विषयी प्रेम काय एका रात्रीत उफाळून आल नाही कारण त्यामागे अनेक कारणे आहेत ते सांगितले तर तुम्ही अवाक व्हाल तरीसुद्धा मी त्यातील एक कारण सांगूनच टाकतो दोन अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती असणाऱ्या अमृता फडणवीस यांच्यावर कोणातरी मध्यस्था मार्फत काही लाखांची किंवा कोटींची डायरेक्ट भेट देण्यात आली होती असा आरोप कोणीतरी केला होता ? पण हे प्रकरण फडणवीसांच्या अंगलट येतयं अस दिसताच त्यांनी त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संगनमत करून ते प्रकरण आपसूकच निभावल अर्थात यात किती तथ्य आहे हे मला माहीत नाही , त्यानंतर या दोघांची चांगलीच गट्टी जमली मग त्यातून अजितदादा यांनी काकांना शेवटचा राजकीय रामराम ठोकला आणि भाजपला अजितदादा यांच्या पक्षाची गरज नसताना त्यांना उपमुख्यमंत्री पद तर दिलंच शिवाय आणखी आठ मंत्र्यांची खिरापत वाटली .
आता त्यातील बहुतेक मंत्री विशेषतः छगन भुजबळ किंवा अन्य मंत्री येत्या विधानसभा निवडणुकीत ऐंशी नव्वद जागांची मागणी जिभेला टकली लावल्यासारखी करतात , याचा अर्थ त्यांना आता सत्तेचा बराच माज आलेला आहे कारण ज्या पक्षाला चार खासदारकीच्या मागे इनमिन एक जागा कशीबशी जिंकता आली , आता त्यांनी अंथरूण पाहून पाय पसरावे नाहीतर पांघरूण अपूर पडेल याचा अर्थ असा की पाय झाकायला गेला की तोंड उघड पडेल अन् तोंड झाकायला गेला की पाय उघडे पडतील म्हणून आता यांनी स्वतःच अवसान ओळखताना आपल्या शरिराची मुटकुळी बांधलेली बरी ! याचा अर्थ जे मिळेल ते पदरात पाडून घेतल तर होईल अन्यथा ‘ तेलही जाईल आणि तुपही जाईल अन् हातात केवळ केरातल मुसळ येईल ‘ यात काही शंका नाही हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे .

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.