आपला जिल्हाधार्मिकप्रेरकसामाजिक

श्री अकलाई देवीची चंद्रारुढ आसनस्थ अवस्थेतील महापूजा

श्रीअकलाई देवीची चंद्रारुढ आसनस्थ अवस्थेतील महापूजा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

(आकाश भाग्यवंत नायकुडे)

मुंबई दिनांक 24/8/2023 : श्रावण मास दुर्गाष्टमीनिमित्त ग्रामदेवता श्रीअकलाई देवी देवस्थानने दिनांक 22, 23 व 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत श्रीदेवी महात्म्य सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. समाप्ती निमित्त मंदिरात आज दिनांक 24 रोजी श्री अकलाई देवीची चंद्रारुढ आसनस्थ अवस्थेतील महापूजा करण्यात आली.
इस्रो ने पाठविलेले भारताचे चांद्रयान-३, निर्धारित चाळीस दिवस प्रवास करून काल दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी नियोजित सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सुरक्षित पोहचले व भारताची अंतराळातील चंद्रयान-३ ची मोहीम यशस्वी झाली. या यशस्वी मोहिमेचे औचित्य साधून देवस्थानच्या गुरव बंधूंनी आज दि.25/8/2023रोजी श्रीअकलाई देवींची चंद्रारुढ आसनस्थ अवस्थेतील महापूजा करून डोळस श्रद्धा आणि प्रगत विज्ञान समय सुचकतेचे दर्शन घडविले. श्रीअकलाई देवी मंदिरात देवीचा साज आरास नेहमीच धार्मिक, पौराणिकते बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पूरक, कृषीनिष्ट, वैज्ञानिक, बौद्धिक ज्ञानवर्धक अशा विविध नयनमनोहर पद्धतीने नटलेल्या पैलूंनी करण्यासाठीची आपली वडिलोपार्जित अखंड परंपरा देवस्थानच्या गुरव बंधूंनी जपलेली आहे. त्यानिमित्त साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता याप्रिंट मीडियाचे आणि aklujvaibhav.in याडिजिटल मीडियाचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी गुरव बंधूंचे कौतुक करून त्यांचे आणि त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या कल्पक कार्यकारी विश्वस्त यांचे विशेष अभिनंदन केले.

(छायाचित्र :- केदार लोहकरे,अकलूज.)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.