कृषी व व्यापारमहाराष्ट्र

2410 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दराने कांदा खरेदी करु नये, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करनार.. विठ्ठल पवार राजे

2410 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दराने कांदा खरेदी करु नये, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करनार.. विठ्ठल पवार राजे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

(आकाश भाग्यवंत नायकुडे)

मुंबई दिनांक 24 ऑगस्ट 2023
गेले डिसेंबर महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल अत्यंत बेहाल झालेले होते. कांद्याचे दर सतत कोसळत 25 पैसे किलोने निर्लज्जन सदासुखी प्रमाणे कांदा खरेदीला गेला. मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आता दोन पैसे मिळण्याच्या वेळी आली तेंव्हा, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावत 40% सुलतानी कर लावलेला आहे. हा 15 ऑगस्ट च्या आजादी नंतर चारच दिवसांनी इंग्रजांपेक्षा सुलतानी आदेश केंद्र सरकारने काढलेला आहे. तो तात्काळ मागे घ्यावा या बाबत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने पुणे, नगर, नाशिक, सोलापूर येथे आंदोलनं केली. त्याचे यश म्हणून केंद्र सरकारने 2410/- रुपये प्रतिक्विंटल नाफेड व एनसीसीएफ मार्फत प्रत्येकी एक लाख क्विंटल, असे 2लाख कांदा खरेदी करण्याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खऱ्या अर्थाने दखल केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली. त्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पदाचा वापर करत केंद्र सरकारकडून 2410 प्रति क्विंटल रेट करण्यामध्ये सफलता मिळवलेली आहे. परंतु राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा कांदा हा 2410 प्रतिक्विंटल बेस रेट विक्रीचा लावून त्यापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करणाऱ्या बाजार समित्या, उपबाजार समित्या, आडत्या किंवा व्यापाऱ्यांनी कमी दराने खरेदी केल्यास त्यांचेवर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई

करण्याची मागणी विठ्ठल पवार राजे यांनी केली आहे. या बाबत संघटनेने मुख्यमंत्री, गृह मंत्री, पणन मंत्री , पणन संचालक महाराष्ट्र राज्य, नाफेडच्या दिल्ली व नाशिक विभाग तसेच एनसीसीएफ च्या नाशिक आणि केंद्र सरकारच्या विभागाकडे पत्र व्यवहार केलेला आहे. त्यांच्यासोबत भ्रमणध्वनी वरून देखील समक्ष चर्चा झाली असल्या बाबतची माहिती देताना विठ्ठल राजे पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने एनसीसीएफ आणि नाफेडच्या मार्फत प्रत्येकी एक, एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे आदेश दिलेले आहेत. सदरचा कांदा करताना खरेदी करताना कांद्याचा बेस रेट 2410 रुपये प्रतिक्विंटल ठरलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या संबंधित सर्व बाजार समिती त्यांनी सर्व कांदा नाफेड केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दराने खरेदी करू नये. तसे गैरप्रकार कोणी केल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी याबाबत अहमदनगर, नाशिक, पुणे, आणि सोलापूर जिल्ह्यांतील बाजार समितीचे सचिव आणि चेअरमन, आडते, व्यापारी असोसिएशन सोबत संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत वरील बाबींची माहिती दिलेली असून सर्व आडते व्यापारी व असोसिएशन बाजार समितीचे सचिव अध्यक्ष यांनी त्यास दुजोरा दिलाआहे.


जवळपास सर्वच बाजार समितीचे सचिव, अध्यक्ष, असोसिएशनचे अध्यक्ष यांनी भ्रमणध्वनीवरून झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात यापुढे 2410 प्रतिक्विंटल पेक्षा कमीने कांदा खरेदी केला जाणार नाही किंवा त्याची बोली लावली जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या संदर्भात सर्वांचे एकमत झालेले आहे. संबंधित सर्वांना तशा सूचना दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी दिली यावेळी संघटनेचे युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर युवक अध्यक्ष महेश गिरी, संघटनेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष राहुल घोडके जालन्याचे युवक अध्यक्ष योगेश कदम, तुळजापूरचे अध्यक्ष शिवानंद बिराजदार व जालना तालुक्याचे कार्याध्यक्ष गजानन वाडेकर तसेच संघटनेने अहमदनगर जिल्हा व घोडेगाव बाजार समितीला संघटनेचे निवेदन दिले यावेळी संघटनेचे प्रदेश कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील पंढरीनाथ कोतकर , संदीप, दादा पाटील नाबदे, जगन्नाथ कोरडे पाटील शेतकरी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.