आपला जिल्हाराजकीयलेख

🟣जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं आणि पुन्हा जिंकायचं ! 🔵श्री शंकरच्या” निमित्ताने माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरण पूर्वपदावर !

🟣जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं आणि पुन्हा जिंकायचं !

🔵”श्री शंकरच्या” निमित्ताने माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरण पूर्वपदावर !

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 17/8/2023 :
माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासात डोकावले गेले तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचेच वर्चस्व तालुक्यावर राहीले आहे, मग ते भारतीय काँग्रेस पक्षात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असुदेत माळशिरस तालुक्यातील मतदारांनी देखील पक्षीय राजकारणाला नाकारत मोहिते पाटलांच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले.
मोहिते पाटलांच्या तालुक्यातील राजकीय वर्चस्व त्यांच्या सहकारी संस्थात्मक स्थितीवर अवलंबून राहीले आहे. मोहिते पाटील यांनी तालुक्यात सहकारी संस्थाचे जाळे विणले, शिक्षण संस्था उभारल्या या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार संधी उपलब्ध झाली.
तालुक्याची जिओपाॅलिटीक्सची स्थिती व ऊसकेंद्रीत अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानेच माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात सहकार महर्षि शंकरराव मोहित पाटील सहकारी साखर कारखाना व तालुक्याच्या पश्चिम भागात शंभूमहादेवाच्या पायथ्याला असणारा श्रीशंकर सहकारी साखर कारखाना एकाच तालुक्यात मोहित पाटलांचे दोन कारखाने हे कारखाने त्यांचे राजकीय बलस्थान फक्त या दोन कारखान्यांच्या सभासदांच्या घरातल्या लोकांनी जरी मतदान केले तरी तालुक्यात सहजासहजी निवडणूक जिंकता येते हे पाहीले.
मध्यंतरीच्या काळात राजकीय घडामोडी घडल्या घरोघरी मातीच्या चुली या उक्ती प्रमाणे माजी सहकार मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटीलांनी त्यांचे बंधू विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत राजकीय काडीमोड घेतला, प्रतापसिंह यांच्या कडे तालुक्याचे पश्चिम भागाचे वैभव असलेला श्रीशंकर सहकारीचा ताबा आला.प्रतापसिंह यांच्या निधनानंतर कारखान्याचा ताबा त्यांचे सुपुत्र व सध्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कडे येईपर्यंत कारखाना व्यवस्थित सुरळीतपणे चालु होता.डाॅ.धवलसिंह यांच्या कारकिर्दीत श्रीशंकरचे धुराडे बंद झाले. राजकीय दृष्ट्या कारखाना बंदचा फटका मोहिते पाटलांना पश्चिम भागात बसू लागला.याचा परीणाम असा झाला की कधी नव्हे ते विरोधकांनी आपले तोंड वर काढले व मोहिते पाटील विरोधकांनी पश्चिम भागाला आपले राजकीय क्षेत्र बनवले.
पश्चिम भागात पुन्हा गत वैभव प्राप्त करायचे अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून धुराडे बंद असलेला श्रीशंकर कारखान्याच्या निवडणूकीत पॅनल लावून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कारखाना ताब्यात घेतला. पश्चिम भागात कारखान्याच्या माध्यमातून पुन्हा मोहिते पाटील वर्चस्व स्थापित करतील या राजकीय समजेपोटी विरोधकांनी कारखाना चालू न होऊ देण्यासाठी षडयंत्रे रचले परंतू स्वतः चेअरमन पदाची जबाबदारी खांद्यावर घेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भागीरथी प्रयत्नाने कारखाना चालू करून पाठीमागे ज्यां लोकांनी शेतकऱ्यांची बिले थकवली त्यांचे सुद्धा बीले देऊ केली. सभासदांच्या विश्वासावर कामगारांच्या कष्टांवर श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने पाच लाख ऊस टन गाळपाचा टप्पा पार केला आहे…!
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याच चेअरमन पदाच्या कारकीर्दीत कारखान्याचे विस्तारीकरण होणार आहे.बंद अवस्थेतील कारखाना चालू करून विस्तारीकरणाच्या टप्प्यापर्यंत मोहिते-पाटील परीवाराने कायम शेतकरी व कामागारचे हित पाहीले.
२०१४ ला माढा लोकसभेला मोदी लाटेत पवार साहेबांनी माढा लोकसभा लढविणार नसल्याचे सांगत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गळ्यात लोकसभेची माळ पडली मोदी लाट व स्वाभिमानी शेतकरी चळवळीचा झंझावात व तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र असताना सुद्धा माळशिरस तालुक्याने ७५००० हजारांचे मतदान दिले हे मोहिते पाटलांचे हक्कांचे मतदान होते. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकी पुर्वी राजकीय उलथापालथ झाली. मोहिते पाटील भाजपवासी झाले. लोकसभेच्या निवडणुकीत तालुक्यातील मोहिते पाटील विरोधक भाजप सोबत आली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतःचा ७५००० हजारांचा मतांचा आकडा व विरोधकांचा मतगठ्ठा धरून आम्ही लोकसभेला माळशिरस तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य देऊ म्हणून सांगितले.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ते जाहीर ही केले व निकाला नंतर घडलेही तसे.
मोहिते पाटील विरोधक हे लोकसभेला एकत्र होते ते लागलीच २०१९ विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादीत गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत आयत्या वेळेस फाॅर्म भरण्याच्या काही तासापूर्वी राम सातपुते यांचे नाव फायनल केले व मोहिते पाटलांनी निवडून देखील आणले परंतू लोकसभेला तालुक्यातील एक लाखांचे मताधिक्य दोन हजारावर आले.या गोष्टीचे भांडवल मोहिते पाटील विरोधक करू लागले. पण लाखांचे मताधिक्य दोन हजारांवर का आले याची कारणमीमांसा केली पाहीजे.
एक आयत्या वेळी तालुक्याच्या बाहेरील उमेदवार दिला गेला..दोन राम सातपुते यांची मुस्लिम विद्यार्थ्यांबरोबर भांडणाची विद्यापीठातील क्लीप वायरल झाली..तीन सातपुते संघाचे म्हणून विरोधकांच्या राज्यस्तरीय स्टार प्रचारकांकडून प्रभावी प्रचार केल्याने दलित मुस्लिम मतदान झाले नाही..चार महत्वाचे श्रीशंकर कारखाना बंद हे सर्व गणित लक्षात घेता नवखा व संघाचा ठपका असलेला भाजपचा उमेदवार शेकाप,काँग्रेस,राष्ट्रवादीचा मतदार राहीलेल्या माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांनी निवडून आणला हे वास्तव आहे.
आताच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत देखील मोहिते पाटलांचे मताधिक्य दोन हजारांवर आले म्हणून कुरघोडीचे राजकारण झाले मात्र मोहिते पाटील समर्थक स्थानिक आघाड्या नातेपुते व श्रीपूर महाळुंग मध्ये निवडून आले तर माळशिरस मध्ये पक्षाच्या चिन्हावर. वरवर आव्हानात्मक वाटणारी हि निवडणुक सोपी का गेली तर श्रीशंकर कारखाना पुन्हा उर्जितावस्थेत आला आहे. लोकांनी विश्वास पुन्हा मोहिते पाटलांच्यावर टाकला आहे.
मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा जे आपले होते, जे दुर गेलते,जे नव्याने येऊ इच्छितात त्या सर्वांना सोबत घेत “श्री शंकरच्या” निमित्ताने माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरण पूर्वपदावर आणले आहे.
जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं आणि पुन्हा जिंकायचं ! श्री शंकर सहकारी साखर कारखान्यांच्या निमित्ताने मोहिते पाटील पुन्हा जिंकले आहेत.

समाधान वाघमारे
8668239761

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.